पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साठे, उदय परशुराम संरक्षण खंड मुख्यालयाला शोधण्याची व त्यावर हल्ला करण्यासाठी दिशादर्शन करण्याची जबाबदारी होती. शत्रूच्या मुख्यालयाचे बंकर सहज लक्षात येणार नाहीत अशा पद्धतीने लपवण्यात आले होते. फ्लाइट लेफ्टनंट हेमंत सरदेसाई यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली व त्यामुळे १६० शत्रू सैनिकांना ठाकर करून मुख्यालयावर ताबा मिळवणे आपल्या सैन्याला शक्य झाले. दि. ६ डिसेंबर रोजी त्यांनी तेजगाव हवाई तळावर हल्ला करून तो निकामी करण्यात यश मिळवले. दि. १२ डिसेंबरच्या रात्री त्यांनी नरसिंगड़ी हवाई तळावर हल्ला केला व दिवसा आणखी हल्ले करत तो निरूपयोगी करण्यात यश मिळवले. १४ डिसेंबर रोजी ढाक्यातील अत्यंत महत्त्वाच्या सैनिकी ठिकाणांवर हल्ले करून त्यांना अपरिमित नुकसान पोहोचवले व त्यामुळे बांगलादेशातील पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करणे भाग पडले. | या सर्व हल्ल्यांमध्ये फ्लाइट लेफ्टनंट हेमंत सरदेसाई यांनी धाडस, कौशल्य व कार्याप्रती अत्युच्च निष्ठेचे प्रदर्शन घडवले. या कामगिरीबद्दल फ्लाइट लेफ्टनंट हेमंत सरदेसाई यांना दि. ६ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना ‘वीरचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साठे, उदय परशुराम भूसेना - मेजर वीरचक्र । २८ जानेवारी १९४६ उदय परशुराम साठे यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) येथे झाला. खडकवासला, पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून सैनिकी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी दि. २५ डिसेंबर १९६६ रोजी सैन्याचा तोफखाना विभागात सेवा करण्यास सुरुवात केली. | १९७१ च्या पाकिस्तान युद्धामध्ये भूसेनेच्या कुमाऊं रेजिमेंटमधील एका बटालियनबरोबर टेहळणी अधिकारी म्हणून काम करण्याची जबाबदारी कॅप्टन साठे यांच्याकडे होती. या बटालियनकडे पूर्व विभागातील शत्रूची काही ठिकाणे ताब्यात घेण्याची जोखमीची कामगिरी सोपवण्यात आली होती. शत्रूकडून होणा-या जोरदार गोळीबाराची पर्वा न करता त्यांनी पुढे सरकत आपल्या तोफखान्याला शत्रूवर मारा करण्यासाठी मार्गदर्शन केले. लक्ष्य जवळ आल्यानंतर त्यांनी स्वत: हल्ल्यात भाग घेऊन शत्रूचे अनेक मोर्चे नष्ट करण्यात यश मिळवले. या कामगिरीमध्ये कॅप्टन साठे यांनी जिद्द, निष्ठा आणि धाडसाचे सर्वोच्च उदाहरण सादर केले. त्याबद्दल दि. ६ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना ‘वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नंतर महाराष्ट्र सरकारने त्रांना महाराष्ट्र गौख पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. शिल्पकार चरित्रकोश ५६४