पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड सप्रे, विजयकुमार नारायण सप्रे, विजयकुमार नारायण वायुसेना - ग्रूप कॅप्टन वीरचक्र १६ ऑगस्ट १९४५ | कोल्हापूरमधील पारगाव या छोट्याशा गावात विजयकुमार नारायण सप्रे यांचा जन्म झाला. कोल्हापुरातील राजाराम विज्ञान महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. दि. ३१ डिसेंबर १९६७ रोजी ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले. ‘ऑपरेशन पवन'मध्ये त्यांचा सुरुवातीपासूनच सहभाग होता. श्रीलंकेत भारतीय शांतिसेनेत कार्यरत असताना विंग कमांडर सप्रे यांच्याकडे हेलिकॉप्टर मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम सोपविण्यात आले होते. । | दि. ११ ऑक्टोबर १९८७ रोजी सप्रे चार एम.आय.-८ हेलिकॉप्टरांचा समावेश असलेल्या रात्रीच्या विशेष हवाई मोहिमेत सहभागी झाले होते. लिट्टे सैनिकांकडून जोरदार गोळीबार होत असताना विजयकुमार यांनी आपल्या तुकड्यांना निर्दिष्ट हेलिपॅडवर उतरवण्याची कामगिरी यशस्विरीत्या पार पाडली. ही मोहीम अत्यावश्यक स्वरूपाची असल्याने, त्यांनी स्वत:च्या सुरक्षिततेची यत्किंचित तमा न बाळगता असामान्य धैर्य दाखवले आणि तीन वेळा ती कामगिरी यशस्वीपणे सिद्धीस नेली. स्वत:चे हेलिकॉप्टर अत्यंत क्षतिग्रस्त होऊनही विंग कमांडर सप्रे यांनी स्थितीचा तत्काळ अंदाज घेत महत्-कौशल्याने विमान आपल्या ठाण्यावर परत नेले. भूमीवरून शत्रूकडून जोरदार गोळीबार होत असताना विंग कमांडर विजयकुमार सप्रे यांनी उच्च पराक्रम, कर्तव्यनिष्ठा आणि सर्वोच्च प्रतीचे व्यावसायिक नैपुण्य दाखविले. सरदेसाई हेमंत शरदकुमार वायुसेना - फ्लाईट लेफ्टनंट वीरचक्र | दि. ११ डिसेंबर १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या फ्लाइट लेफ्टनंट हेमंत सरदेसाई पूर्व विभागात एका लढाऊ विमानांच्या ताफ्यात सेवा करीत होते. ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान त्यांनी ११ हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला. एका मोहिमेमध्ये त्यांच्यावरराजिंदरगंज व महिंदरगंज दरम्यान शत्रूच्या एका स । शिल्पकार चरित्रकोश ५६३