पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड वालनकर, जी. बी. । व वालनकर, जी. बी. असिस्टंट कमांडंट सीङ्का सुरक्षा दल वीरचक्र १९७१ च्ङ्गा पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत असिस्टंट कंपनी कमांडर जी.बी. वालनकर यांनी धैर्याने आणि आत्ङ्कविश्वासाने पूर्व भागात मुसंडी मारली. त्यांच्या या कारवाईला शत्रूकडून प्रखर विरोध झाला. पाकिस्तानी स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या काही सैनिकांचा समावेश असलेल्या शत्रूच्या तुकडीवर वालनकरांनी आपल्या सहकारी जवानांसह हल्लाबोल केला आणि अगदी धाडसाने त्यांनी शत्रूचा बीमोड केला. मृत्यूला न घाबरता त्यांनी आपल्या जवानांना प्रोत्साहन देत शत्रूची ठाणी काबीज केली. रणांगणावर दाखविलेल्या धैर्य, शत्रूवर विजय मिळविण्याचा निर्धार आणि नेतृत्वगुणांबद्दल असिस्टंट कंपनी कमांडर वालनकर यांना १९७१ साली ‘वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. वारिंदर सिंग भूसेना - मेजर २४ जानेवारी १९५५ - २६ जून १९८७ वारिंदर सिंग यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथे झाला. सिंग यांचे वडील सुद्धा सैन्यात होते. दि. १३ जून १९७६ रोजी वारिंदर सिंग हे सैन्यात दाखल झाले. जगातील सर्वाधिक उंचीच्या सैनिकी तळ असणा-या सियाचीन याठिकाणी एप्रिल मध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली होती. | सततच्या खराब हवामानात भारतीय सीमांचे रक्षण करण्याचे मोठे आव्हान मेजर वारिंदर सिंग यांच्या दलावर होते. जून मध्ये सियाचीन मधील जिला फोंडला सैनिकी तळाजवळील हिमकड्यावरून अचानक गोळीबार सुरू झाला. खराब हवामानाचा फायदा घेत शत्रूकडून हा गोळीबार सुरू झाला. दि. २३ जून १९८७ ची रात्र होती. या रात्री अचानक सुरू झालेल्या या हल्ल्यापासून संरक्षण करण्याबरोबर शत्रूच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी मेजर वारिंदर सिंग यांनी सातशे फूट उंचीची एक हीमकडा चढून जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. सियाचीन मधील बिला फोंडलातील ठाण्यावर प्रतिबंधक संरक्षणार्थ मशीनगन व शिल्पकार चरित्रकोश