पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रेगे, पंढरीनाथ अनंत संरक्षण खंड छांब-जुरीयान विभागात त्यांच्या हल्ल्यांमध्ये शत्रूच्या पायदळाचे निर्णायक अशा स्वरूपाचे नुकसान झाले. शत्रूच्या सैन्यावर व शस्त्रसाठ्यावर हल्ला करून त्यांनी चार रणगाड़े व चार सैनिकी वाहने नष्ट केली. | दि. १७ डिसेंबर रोजी त्यांनी लाहोर रेल्वे जंक्शनवरील हल्ल्याचे नेतृत्व केले. या हल्ल्यात संपूर्ण रेल्वे व्यवस्थेचे अपरिमित नुकसान झाले. या सर्व हल्ल्यांमध्ये फ्लाइट लेफ्टनंट राणे यांनी धाडस, कौशल्य व कार्याप्रती अत्युच्च निष्ठेचे प्रदर्शन घडवले. या कामगिरीबद्दल राणे यांना दि. १७ डिसेंबर १९७१ रोजी ‘बीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. | वायुसेनेतून निवृत्ती स्वीकारून चेरी हासंद राणे यांनी जहाज दुरुस्तीची कंपनी स्थापन केली होती. मुंबई येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. राणे, लक्ष्मण वासुदेव भूसेना - लान्स हवालदार वीरचक्र १ जुलै १९३० - १० डिसेंबर १९७१ लक्ष्मण वासुदेव राणे यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. दि. २ डिसेंबर १९५२ रोजी ते भूसेनेत दाखल झाले. मराठा लाइट इंफन्ट्रीत ते विभागीय कमांडर या पदावर कार्यरत होते. पूर्व क्षेत्रात जमालपूर येथे असलेल्या या तळाने शत्रूला त्या बाजूने अडवून ठेवण्याची जबाबदारी पेलली होती. दि. १० डिसेंबर १९७१ या दिवशी त्यांच्या तुकडीवर शत्रूने हल्ला केला. शत्रूचा पहिला हल्ला त्यांनी परतवून लावला. पण नव्या सैनिकांना घेऊन शत्रूने पुन्हा हल्ला चढवला, तेव्हा लक्ष्मण राणे पुढे सरसावले. उडी मारून ते खंदकातून बाहेर आले आणि पराक्रमाची शर्थ करीत शत्रूच्या तीन सैनिकांना त्यांनी यमसदनी धाडले. परंतु दुर्दैवाने शत्रूच्या हल्ल्यात लक्ष्मण वासुदेव राणे यांना वीरमरण आले. रेगे, पंढरीनाथ अनंत भूसेना - मेजर वीरचक्र । २२ मे १९१६ | पंढरीनाथ अनंत रेगे यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. पुण्यातील वाडिया महाविद्यालयामधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते दि. २४ जानेवारी १९४३ रोजी सैनिकी सेवेत रुजू झाले. १९६२ च्या चीन युद्धादरम्यान मेजर रेगे यांच्याकडे नेफा भागातल्या हेन्कार तळावरील १०० सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व होते. शिल्पकार चरित्रकोश ५५४