पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड महार, पुंडलिक बाकाराम महार, पुंडलिक बाकाराम भूसेना - नायब सुभेदार, मानद सुभेदार वीरचक्र १५ जून १९२५ | अमरावती जिल्ह्यातील बंडली या गावात पुंडलिक बाकाराम महार यांचा जन्म झाला. दि. १५ जून १९४५ रोजी ते सैन्यात पहिल्या महार रेजिमेंटमध्ये शिपाई म्हणून दाखल झाले. | जम्मू व काश्मीरमधील नौशेरा या भागातील सात क्रमांकाच्या चौकीवर पुंडलिक महार यांची नेमणूक झाली होती. ते तेथे चार क्रमांकाच्या स्थानावर होते. दि. ६ फेब्रुवारी १९४८ रोजी या चौकीवर शत्रूने पद्धतशीर रचना करून मोठ्या संख्येने हल्ला केला. शिपाई पुंडलिक महार यांनी अतिशय जवळून शत्रूवर गोळीबार सुरू केला. जवळजवळ एक ते दीड तास ते गोळीबार करीत होते. | या लढाईत त्यांच्या मानेला गोळी लागली. पण स्वतः जख़मी होण्याआधी त्यांनी शत्रुपक्षातील जवळजवळ ५०० जणांना घायाळ केले होते. । शिपाई पुंडलिक महार यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानासाठी व शौर्यासाठी त्यांना ‘बीरचक्र बहाल करण्यात आले. नंतर ते नायब सुभेदार व मानद सुभेदार पदापर्यंत कार्यरत राहिले. म । माऊशो, अँथनी लुईस अल्वारो वायुसेना - स्क्वॉड्रन लीडर वीरचक्र २८ सप्टेंबर १९३२ अँथनी लुईस अल्वारो माऊशो यांचा जन्म मुंबई येथे झाला. दि. १७ जानेवारी १९५३ रोजी स्क्वॉड्रन लीडर म्हणून त्यांची वायुसेनेत नेमणूक झाली. । | १९६५ च्या पाकिस्तान युद्धात स्क्वॉड्रन लीडर अँथनी माऊशो हे टेहळणी पथकाचे (रिकॉनिसन्स स्क्वॉड्रन) कमांडर होते. सेक्शनच्या एकूण अकरा मोहिमांसाठी त्यांनी मार्गदर्शन केले. शिल्पकार चरित्रकोश