पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड सत्यनारायण, नीला पीलरसेट्टी महत्त्वाची माहिती मिळवण्यातही ते यशस्वी झाले होते. राज्याचे पोलीस महासंचालक असताना महामार्ग पोलीस संरक्षण यंत्रणेत आवश्यक ते प्रशासकीय बदल करण्यातही सराफांचा पुढाकार होता. निवृत्तीनंतर त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने संघटित गुन्हेगार टोळ्यांविरुद्धचा संशोधन अहवाल तयार करण्यात महत्त्वाची कामगिरी केली. राज्य पोलीस दलांच्या अगदी गावपातळीपर्यंतच्या पोलीस स्टेशनात आवश्यक त्या संख्येत मनुष्यबळ कसं पुरवावं याचा सांख्यिकी आलेख त्यांनी तयार केला होता. आज गुजरातमध्ये या अहवालाच्या आधारे मनुष्यबळ कार्यरत आहे. शासनातर्फे पुण्यात स्थापन झालेल्या पोलीस संशोधन केंद्राचे ते पहिले मानद संचालक होते. आपल्या पोलीस खात्यातील अनुभवांवर आधारित वृत्तपत्र लेखांबरोबर कादंबरी आणि कथा असे विपुल लेखन सराफांनी केले आहे. व्यवस्थापन आणि नेतृत्व या विषयांवरही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भगवद्गीतेतील कर्म या विषयावर सराफ यांनी लिहिलेले ‘दी मिस्ट्री ऑफ कर्म’ (कर्माचं गूढ) हे अभ्यासपूर्ण आणि वाचनीय पुस्तक वाचकांमध्ये लोकप्रिय ठरलं आहे. पोलीस दलातील नोकरीत महत्त्वाचं योगदान दिल्याबद्दल सराफांना १९७४ ला पोलीस पदक मिळालं. तर १९८६ साली त्यांना विशेष कामगिरीसाठी राष्ट्रपती पदकानं गौरवण्यात आलं. याशिवाय त्यांना ‘इंटरनॅशनल जायंट्स अ‍ॅवार्ड फॉर पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ हा पुरस्कार १९८९ ला मिळाला. तसंच १९९० ला पोलीस प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सराफ यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘नॅशनल सिटीझन्स अ‍ॅवार्ड’ मिळाले आहे. वसंतराव सराफ आज निवृत्तीनंतरचं आयुष्य लेखन आणि सामाजिक कार्यात मग्न राहून सफल करत आहेत. - सुधाकर कुलकर्णी सत्यनारायण, नीला पीलरसेट्टी राज्य निवडणूक आयुक्त-महाराष्ट्र राज्य ५ फेब्रुवारी १९४९ महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांचा मुंबई येथे जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सुशिला आणि वडिलांचे नाव वासुदेव आबाजी मांडके होत. ते पोलीस खात्यात कार्यरत होते. नीला सत्यनारायण यांना घरातूनच आध्यात्मिकतेचा वारसा व संस्कार मिळाले. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये शालेय शिक्षण व शालान्त परीक्षा दिल्लीमध्ये, असा त्यांचा शालेय जीवनाचा प्रवास झाला. १९६५ साली दिल्लीत बोर्डाच्या परीक्षेत संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून त्या बोर्डात पहिल्या आल्या. त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला आणि त्या आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र कॅडरमध्ये १९७२ ला रुजू झाल्या.जगामध्ये काहीतरी करून दाखवायचे असेल तर जगात जी भाषा स्वीकारली जाते त्याच्यावर आपण प्रभुत्व मिळविणे आवश्यक आहे हाच इंग्रजी विषय मुद्दाम निवडण्याचा त्यांचा हेतू होता. प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर नागपूरपासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. सेवाकाळात त्यांनी भूषविलेली महत्त्वाची पदे त्यांना थोडी उशीराच मिळाली. त्या काळी प्रशासकीय व्यवस्थेला स्त्री अधिकार्‍यांची सवय नव्हती. त्यामुळे प्रशासनाचा आणि शासनाचा विश्वास संपादन करता करता पहिली काही वर्षे स्वत:ला सिद्ध करण्यात गेली. परंतु एकदा शासनाने त्यांच्यावर विश्वास टाकल्यानंतर नगर विकास, गृह, माहिती व जनसंपर्क, अन्न व नागरी पुरवठा, महसूल व वन विभाग अशा काही महत्त्वाच्या शिल्पकार चरित्रकोश