पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिहिले आहे. मायकेलवलीने राजामध्ये सिंहाची शक्ती व कोल्ह्याची धूर्तता असावी असे नमूद केलं आहे. थोडक्यात सत्ताधिशांनी कारभार करताना सत्ता ही निघृण व निरकुंशपणे राबवावी व त्याच्या आड येणान्यास साफ करावं असं स्पष्ट रोखठोकपणे प्रतिपादलं आहे. आज जगभर जे राजकारण व सत्ताकारण चालते ते ह्याच तीन सूत्रांच्या आधारे चालतं असं म्हणता येईल. पण आज चाणक्याच्या अर्थशास्त्रा' चे पुनर्मूल्यांकन चालू आहे. नवे नवे अभ्यासक त्यावर वेगवेगळ्या अंगानं प्रकाशझोत टाकीत आहेत. त्यावरून हे स्पष्ट होतं की, आर्य चाणक्य व मायकेलवली आणि अर्थशास्त्र व ‘प्रिन्स' ची तुलना व साम्य शोधण्याचा प्रयत्न चुकीचा व चाणक्यावर अन्याय करणारा आहे. कारण मायकेलवली हा जसा पूर्णतः नेफेड़ पॉवर' व राजकारणामध्ये नैतिकता अजिबात नको' या विचारांचा होता, तसा आर्य चाणक्य खचितच नव्हता. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्थशास्त्र' हा केवळ राज्य प्रशासनाचा विषय हाताळणारा ग्रंथ नाही तर तो जगातला कदाचित पहिला परिपूर्ण व विस्तृत असा समाजशास्त्रीय ग्रंथ होता. त्यांन अपरिहार्य तडजोड व नंद काळातील छोट्या छोट्या राज्यातल्या स्पर्धा, हाणामारी पाहून ती मिटवण्यासाठी ‘रिअल पॉलिटिक्स' चा जरूर अवलंब केला, पण त्याची अंतिम दृष्टी ही जनकल्याणाची होती - वेलफेअर अॅडमिनिस्ट्रेटरची होती. कौटिल्याने राजधर्म सांगताना राजा हा निरंकुश नसून तो ‘धर्मा' च्या सीमेने बद्ध असतो व अत्यंत कठोर परिश्रमाचे नियमित व ‘श्रीमान योगी' सारखे जीवन व्यतित करणारा तो राज्याचा उपभोगशून्य स्वामी असतो असे नमूद केले. कौटिल्याचा अर्थशास्त्र' हा ग्रंथ मूलत: अर्थशास्त्र, राज्यकारभार व राज्य चालवण्यासाठी कला (स्टेट क्राफ्ट) विशद करणारा सामाजिक ग्रंथ आहे. तो शुद्ध तर्कशास्त्र व संशोधनाच्या आधारे रचला गेला आहे. त्याच्या पूर्वी जे भारतीय ग्रंथ रचले गेले, त्यांची सरूवात व अर्थशास्त्राची सुरूवात पाहा, त्यातला फरक लक्षात येईल. सर्व पौराणिक व प्राचीन ग्रंथाची सुरूवात गणेशाच्या स्मरणानं झाली आहे, पण अर्थशास्त्राच्या सुरूवातीला चाणक्यानं देवा ऐवजी दोन महान गुरू, एक असुरांचा व एक देवांचा गुरू-शुक्राचार्य व बृहस्पती यांना वंदन करून केली आहे. हा फार महत्त्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. पुराण काळात देव व असुर हे एकमेकांचे शत्रूपक्ष होते हे सर्वविदीत आहे, त्यामुळे त्यांच्या विचारसरणी, मते व दृष्टिकोन भिन्न असणार. कौटिल्याने दोन्ही विचारांचा अभ्यास करून नीरक्षीर विवेकानं त्यातली उत्तम व ग्राह्य तत्त्वे आपल्या ग्रंथात घेतली आहेत. भारतीय नोकरशाहीचा इतिहास । भारताच्या मध्ययुगीन इतिहासात मुघल काळात अकबराचा दिवाण राजा तोडरमलनं आधुनिक महसूल प्रशासनाचा शास्त्रशुद्ध पाया रचला. आजही भारतात सत्तर टक्केपेक्षा जास्त नागरिक शेतीवर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी जमीन ही सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. राजा तोडरमलने जमीन महसुलाची शास्त्रीय पद्धतीने आखणी केली, त्यानं विशिष्ट नियमांच्या आधारे जमिनीचे सर्वेक्षण व मोजणी केली. त्या काळात उद्योग व व्यापारापेक्षा जमीन महसूल हा राज्यकर्त्यासाठी उत्पन्नाचा प्रमुख स्रोत होता, त्यामुळे रयतेला न्याय देत जसे तोडरमलने कसेल त्याची जमिन हे आधुनिक काळातले तत्त्व स्वीकारले, तसेच राज्यकारभारासाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोतही महसूल करांची आखणी करून केला. आजही भारताचे जमीन व महसूल प्रशासन तोडरमलच्या पद्धतीचे थोडाफार कालानुरूप बदल स्वीकारून चालते. त्यानंतर भारताच्या लोकप्रशासनाचा महत्त्वाचा पण काहीसा दुर्लक्षित राहिलेला टप्पा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे काळाच्या पुढे असलेले, १५० शिल्पकार चरित्रकोश