पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आविष्कार लागू पडणारे आहेत. हे विज्ञान आपलं, हे परक्यांचं, असा दुजाभाव आपण त्यात करू शकत नाही. ज्या गुरुत्वाकर्षणाचा साक्षात्कार महाराष्ट्रात होतो, तोच इतर प्रदेशांमध्येही होतो. त्याचं नियमबद्ध स्वरूप उलगडून दाखवणारा आयॉक न्यूटन इंग्रज होता किंवा त्याहून वेगळ्या भूमितिबद्ध रूपड्याचं दर्शन घडवणारा अल्बर्ट आइन्स्टाइन प्रथम जर्मन आणि नंतर अमेरिकन होता म्हणून गुरुत्वाकर्षणावर इंग्लंडचा, जर्मनीचा, अमेरिकेचा, कोणाचाच स्वामित्वहक्क (कॉपीराइट) निर्धारित होऊ शकत नाही. तंत्रज्ञानाच्या बाबतीत परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. तंत्रज्ञानाचा विकास उपभोग्य वस्तूच्या उत्पादनासाठी सहसा केला जातो. अशा उत्पादनाची निकड ज्या प्रदेशात भासते, तिथं त्याचा विकास आणि वापर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं त्या तंत्रज्ञानाची ओळख त्या प्रदेशावरून पटवता येते. तरीही, आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात असं तंत्रज्ञान त्या प्रदेशाच्या सीमा बंदिस्त करून ठेवू शकत नाहीत. त्या सीमा सच्छिद्र बनतात. त्यातून ते तंत्रज्ञान सहजासहजी सीमापार जाऊशकतं. आज चीन किंवा भारत इथं 'मोबाइल फोन'चा वापर सर्वाधिक आहे, पण त्यापोटी हे तंत्रज्ञान चिनी किंवा भारतीय असं आपण म्हणू शकत नाही. पण त्याच्या विकासाला हातभार लावणारी मंडळी कोणत्याही प्रदेशातली असू शकतात. ती चिनी किंवा भारतीयही असू शकतात. पण त्यापायी या तंत्रज्ञानाला आपण भारतीय म्हणू शकत नाही. ते तंत्रज्ञान जागतिक स्वरूपाचंच राहतं. शेतीच्या बाबतीतही साधारण अशीच परिस्थिती आहे. शेतीचा उगम तैग्रिस आणि यफ्राटिस या नद्यांच्या दोआबाच्या प्रदेशात. म्हणजेच एकेकाळी मेसोपोटेमिया म्हणन. पण आज इराक या नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात झाला. तरीही, शेती हे त्या प्रदेशाचं व्यवच्छेदक लक्षण मानता येत नाही. त्याचा उगम तिथं झाला एवढंच आपण म्हणू शकतो. ती शेती करण्याची एक पद्धत एका प्रदेशात विकसित होते. ती त्या प्रदेशाच्या नावानं ओळखली जाते. म्हणूनच जपानी भातशेती वेगळी, चिनी भातशेती त्याहून निराळी, भारतीय भातशेती आणखी तिसरीच, अशी त्या-त्या शेती करण्याच्या पद्धतींची ओळख असू शकते. तरीही जपानी भातशेतीचा विकास एखाद्या भारतीयाकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा बासमती तांदळाचं हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठीचे यशस्वी प्रयत्न एखाद्या अमेरिकनानं केले म्हणून बासमती अमेरिकन बनत नाही. तरीही, त्याच्या बासमती या नावापुरताच कॉपीराइटचा हक्क भारत बजावू शकतो. __या परिस्थितीत विज्ञान-तंत्रज्ञान या विषयांतील महाराष्ट्राच्या शिल्पकारांची निवड कशी करायची?, त्यासाठी कोणते निकष लावायचे?, या प्रश्नांची सर्वमान्य उत्तरं देणं वाटतं तितकं सोपं नाही. जिनं मानवी ज्ञानसंग्रहात मोलाची भर घातली आहे किंवा जिनं एखाद्या विज्ञानसूत्राचा मागोवा घेत नवोन्मेषशाली तंत्रज्ञान विकसित केलं आहे ती व्यक्ती मराठी भाषक असेल. तर तिचा समावेश आपण महाराष्टाच्या शिल्पकारात करणार आहोत की नाही? मग भलेही त्याची कर्मभूमी महाराष्ट्राबाहेर असो. उलटपक्षी, ज्या व्यक्तीची कर्मभूमी महाराष्ट्र आहे अशी व्यक्ती मराठी भाषक नाही किंवा तिची जन्मभूमी महाराष्ट्र नाही म्हणून आपण तिला वगळणार आहोत का? काही अशीही मंडळी आढळतात, की ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे, त्यांच्या गुणवत्तेला महाराष्ट्रातच कंगोरे पडले आहेत, त्यांनी आपली वैज्ञानिक कामगिरीही महाराष्ट्राच्या भूमीतच पार पाडली आहे, पण त्यांची मातृभाषा मात्र मराठी नाही. अशांचा विचार आपण महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणन करणार आहोत की नाही? महाराष्ट्राच्या उदारमतवादी परंपरेपोटी मराठी भाषेचे ज्ञान न प्राप्त करताही आपलं सारं आयुष्य याच भूमीत व्यतीत करण्याचं स्वातंत्र्य आपण सर्वानाच दिलं आहे. सर्जनशील नवनिर्मितीला या स्वातंत्र्यापोटीच धुमारे फुटत असतात. मग अशा अमराठी दिग्गजांना त्यांचं योग्य स्थान नाकारताना आपण या महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेलाचा नाकारत तर नाही ना? यांसारख्या अनेक प्रश्नांचा उहापोह महाराष्ट्राच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील शिल्पकारांची निवड करताना करणं २० / विज्ञान व तंत्रज्ञान खंड शिल्पकार चरित्रकोश