पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही ठिकाणी चरित्रनायकाच्या अतिपरिचित नावाने नोंद देण्यात आलेली आहे. उदा. कर्मवीर भाऊराव पाटील पाटील, भाऊराव पायगोंडा ज्या नावाने नोंद देण्यात आलेली आहे ते नाव मोठ्या जाड ठशात पहिल्या ओळीत दिलेले आहे. नंतरच्या दुसऱ्या ओळीत त्या व्यक्तीचे मूळ नाव-उपनाव-टोपणनाव तिरप्या जाड ठशात दिलेले आहे. यानंतरच्या ओळीत त्या व्यक्तीचे एकंदर योगदान दर्शविणाऱ्या क्षेत्रांचा उल्लेख केलेला आहे. त्यापुढच्या ओळीत चरित्रनायकाच्या जन्म व मृत्यूच्या तारखा(दिवंगत असल्यास) दिल्या आहेत. जेथे जन्म अथवा मृत्यूच्या तारखा उपलब्ध नाहीत तेथे केवळ साल व शक्य झाल्यास महिनासुद्धा दिलेला आहे. यानंतर चरित्रनोंदीच्या मजकुराची सुरुवात करून त्यात चरित्रनायकाची व्यक्तिगत माहिती, शिक्षण, कार्यक्षेत्राची ठिकाणे व पदे, त्यांचे साहित्यिक कार्य, उल्लेखनीय ग्रंथ व पुस्तके यांची माहिती, त्यांना मिळालेले मानसन्मान आणि पुरस्कार यांचा उल्लेख केला आहे. काही ठिकाणी चरित्रनायकांशी संबंधित संस्थेचे अथवा त्यांच्या साहित्यकृतीचे चित्र देण्याचा प्रयत्न केला आहे. संदर्भसूची चरित्रनोंदीत समाविष्ट माहितीची विश्वसनीयता आणि अधिकृतपणा लक्षात यावा या हेतूने नोंदीच्या शेवटी सदर नोंद लिहिण्यासाठी ज्या संदर्भसाधनांचा वापर केला गेला आहे त्याची सूची दिलेली आहे. या संदर्भलेखनात पुढीलप्रमाणे शिस्त पाळण्यात आलेली आहे: लेखकाचे नाव, संपादक असल्यास तसा उल्लेख; साहित्यकृतीचे नाव', साहित्यकृतीचा प्रकार; प्रकाशक, प्रकाशनस्थळ; आवृत्ती, प्रकाशनवर्ष. हाती आलेल्या अपुऱ्या माहितीमुळे अपवादाने काही ठिकाणी सदरची शिस्त पाळता आलेली नाही, हे वाचकांनी ध्यानात घ्यावे. ज्या ठिकाणी नामोल्लेख नोंद घेण्यात आलेली आहे. तेथे दोन प्रकार संभवतात: १. जर त्या व्यक्तीची अन्य खंडात मुख्य चरित्रनोद दिलेली असेल तर तर्जनी चिन्हाचा उपयोग करून तेथे 'मुख्य चरित्रनोंद समाजकारण खंड, पत्रकारिता खंड' आदी नमूद करण्यात आलेले आहे. २. जर त्या व्यक्तीची नोंद याच खंडात अन्यत्र वेगळ्या नावाने दिलेली असेल, तर तर्जनी चिन्हाचा उपयोग करून ज्या नावाने ती नोंद आढळेल ते नाव देण्यात आले आहे. अकारविल्हे चरित्रकोशातील वर्णमाला, सर्व नावांचा अकारविल्हे स्वरानंतर व्यंजने असा पुढीलप्रमाणे असेल: अ अॅ आ आँ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ - (अनुस्वार) :(विसर्ग) क ख ग घ ङ च छ ज झ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म शिल्पकार चरित्रकोश विज्ञान व तंत्रज्ञान खंड / ११