पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्या लक्षात येऊ लागलं आहे. मी अनेकदा धनुष्य खाली ठेवलं पण टाकलं नाही; कारण जीवनात चांगल्याचं समर्थन करणारा मोठा समाज आहे. तो नसेल संघटित, व्यक्त होणारा, मुठी आवळणारा पण त्याच्या मौनातून, निष्क्रियतेतून मला बळ मिळत गेलं. कारण ते रेषेपलीकडील विरोधाच्या जमेत नव्हते. ज्यांना कुणाला असं जगणं शरण करायचं आहे त्यांच्यासाठी ज्वाला आणि फुले' न्यू टेस्टमेंट, नवगीता, आधुनिक बायबल, पुरोगामी कुराण आहे. माझ्यासाठी हरणाच्या क्षणांना मृत्युंजयी करणारं हे प्रेरणागीत ठरत गेलं. तुम्हासही त्याचं वरदान लाभेल तर नव्या जगात “ज्वाला' असणार नाहीत, असतील तर फुलेच ‘फुले'!

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/६२