पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बँकेचा ध्यास लागलेल्या शिक्षित नि सुजाण मंडळींनी एकविसाव्या शतकाचे देणे म्हणून बुक बँकेचा ध्यास आता घ्यायला हवा. ‘प्रसंगी अखंडित वाचित जावे' या श्लोकातील सातत्य टिकविण्यासाठी, आपलं घर नि जीवन ख-या अर्थाने समृद्ध करण्यासाठी पुस्तके विकत घेऊन वाचायची आपण सवय लावायला हवी. ग्रंथ जत्रा, ग्रंथ मोहळ, लक्ष वाचक संघ, लेखक तुमच्या घरात यांसारख्या योजनांद्वारे ज्ञानगंगा आज आपल्या अंगणी वाहते आहे, तिच्यात हात धुऊन घ्यायची तत्परता आपण नको का दाखवायला?

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/२६