पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येतो. वाचन म्हणजे शब्दार्थाचा संबंध जीवनास जोडणं. वाचन ही क्रिया नाही, ती कला आहे. जीवन ही एक संधी असते. लक्ष लक्ष फे-यांतून येणारी! माणसाचं जीवन पाशवी बनायचं नसेल तर पुस्तकं, चित्रं, माणसं, निसर्ग सारं वाचायला हवं. वाचनाने जग बदलते... अधिक सुंदर होते... सार्थक होते. त्यासाठी ग्रंथोत्सव! ग्रंथ येती घरा... तोचि दिवाळी-दसरा!

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/२१