पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/187

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो चोवीस तासांचा झाला आहे. हेच ज्ञानाचे जागतिकीकरण, सार्वत्रिकरण होय. आज उच्च शिक्षण स्तरावर (१२+) १00 % विद्यार्थी मोबाईल धारक होणे म्हणजे संगणक साक्षर होणेच होय. मोबाईल्स मधील वेगवेगळी अॅपस् अन्य काही नसून नवी अद्यतन ज्ञानस्त्रोत व साधनेच होत. याचे भान ग्रंथालयांना येईल, तेव्हाच ती नव वाचकांची सहाय केंद्रे होतील. अन्यथा नव वाचन संस्कृतीतील ‘समृद्ध अडगळ' या पलीकडे त्यांचे स्थान राहणार नाही.

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/१८६