पान:व्यायामशास्त्र.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३८ ] (२) खेळास विशेष प्रकारची जागा, साधने व खेळगडी यांची आवश्यकता असल्यामुळे यांपैकी एखादें साधन . अनुकूल नसल्यास खेळ बंद ठेवावा लागतो व व्यायाम घडत नाहीं. | ( ३ ) खेळामध्ये पुरेसा व्यायाम होण्यास बराच वेळ मोडावा लागतो. उदाहरणार्थ, क्रिकेट किंवा खोखो खेळतांना आपल्यावर पाळी येईपर्यंत पुष्कळ वेळपर्यंत स्वस्थ बसून रहावे लागते. | ( ४ ) व्यायामाच्या प्रमाणाचे नियमन व त्याची क्रमाने वाढ या गोष्टी साधतां येत नाहींत. (५) खेळाची वेळ आपल्यास सोईची नसेल, तर व्यायाम बुडतो. बायसिकल-फक्त पायाचे स्नायूंस व्यायाम होतो. | पुढे वांकावे लागते यामुळे छातीस थोडा बांक येतो व खांदे पुढील बाजूस वांकतात. बायसिकलवर बसलो असतांना अतिरिक्त श्रम झाले, तरी वेगाच्या व वान्याच्या झुळकेच्या भरात ती गोष्ट आपणांस कळून येत नाही. यामुळे कधी कधी शक्तीबाहेर व्यायाम होतो. शिकार-सर्व स्नायूस व्यायाम होत नाहीं. शरिराचे कांहीं भाग दुर्वल असल्यास क्रमाक्रमाने त्यांचा व्यायाम वाढवून त्यांस सशक्त करण्याचा प्रयत्न करता येत नाहीं. | वहुतेक लोकांना हा व्यायाम घेणे अशक्य आहे. अशक्तांना हा व्यायाम अपायकारक होण्याची भीति आहे. खेळांतील बरेच दोष या व्यायामासही लागू आहेत.