पान:व्यायामशास्त्र.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३७ ] तडफ हीं येत नाहींत.( २ ) या व्यायामापासून सर्व स्नायूस श्रम होत नाहीत. महत्त्वाच्या स्नायूंपैकी पोटाचे स्नायूंस व उरोज स्नायूस (एकंदर श्रमाच्या मानाने) तालमीपासून व्यायाम विशेष मिळत नाहीं असे दिसून येईल. ( ३ ) हा व्यायाम कांहीसा अवघड असल्यामुळे तो अशक्त मनुष्यास विशेष उपयोगी पडत नाही. (४) मोकळी हवा मिळावी तितकी मिळत नाहीं. खोखो, आट्या-पाट्या, क्रिकेट वगैरे खेळ खेळणारांत जो चपलपणा दिसतो तो नुसती तालीम करणा-यांत दिसत नाही. तालमींतील व्यायामाचे जे दोष वर दाखविले आहेत ते फक्त तालीम करून कुस्ती न करणारे लोकांचे व्यायामास लागू आहेत. जे लोक तालमीत कुस्ती करतात, ते तालमीतील माती खणण्याचा उद्योग करतात. खणतांना वांकावे लागत असल्याकारणाने पोटाच्या स्नायूंचे आकुंचन होते;यामुळे खणतांना या स्नायूस चांगला व्यायाम होतो. शिवाय कुस्ती करतांना तर सर्व अवयवांचे चलन होते; म्हणून कुस्तीमुळे बहुतेक सर्व स्नायूस श्रम होतात. कुस्ती करण्यापासून हा विशेष फायदा होतो की, तिजमुळे अंगांत चपलता चांगली राहते. तथापि शिकार करणा-यांत जे चापल्य व जी तडफ राहते ती तालीम करणा-यांत दिसत नाही, हा दोष आहे. निरनिराळे सर्व प्रकारचे खेळ- १ ) सर्व स्नायूंस व्यायाम मिळत नाही. पुष्कळ खेळांमध्ये फक्त एका उजव्या आंगच्या स्नायूस श्रम होतात; यामुळे एकांगीपणा वाढतो. 5 तालीम, कुस्ती, पोहणे, व अंग तोलण्याचे खेळ यांशिवाय व्यायामाच्या बहुतेक प्रकारांनी एकांगीपणा येतो.