पान:व्यायामशास्त्र.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ ३६ ] व व्यायामापासून सुदृढ झालेल्या अवयवांचा फायदा शरिरास व्हावा तितका होणार नाही. म्हणून शारिराचे सर्व भाग ( शाररांतील सर्व स्नायु ) सुदृढ होतील असा व्यायाम असावा. | २ फुफ्फुसे, रक्ताशय, पचनेंद्रिये हीं इंद्रियें अत्यंत महत्वाची आहेत; म्हणून हीं इंद्रिये व्यायामाने सुदृढ झाली पाहिजेत. ३ केवळ शक्तीपेक्षां प्रसंगावधान, चपलता व तडफ यांची व्यवहारांत विशेष आवश्यकता आहे. म्हणून व्यायामाने अंगांत शक्तीबरोबर प्रसंगावधान, चापल्य व तडफ ही आली पाहिजेत. ४ मन आनंदी राहिले पाहिजे. ५ शरिराच्या डाव्या किंवा उजव्या अंगास विशेष व्यायाम मिळून दुसरे अंगास कमी व्यायाम मिळेल असा व्यायाम दोषयुक्त समजावा. । |६ त्याचप्रमाणे, ज्या योगाने शारिराच्या केवळ वरच्या भागास किंवा केवळ खालच्या भागास श्रम पडून त्याचा विकास होऊन दुस-या भागाचा विकास होणार नाही अशा प्रकारचा व्यायामही । दोषयुक्त समजावा. व्यायामाच्या निरनिराळ्या प्रकारांतील दोष. ( सर्वगुणसंपूर्ण व्यायामाचीं जा लक्षणे दिली आहेत ती लाविली असतां निरनिराळ्या व्यायामाचे प्रकारांत कोणते दोष दृष्टीस पडतात ते पुढे दिले आहेत ) दशी तालीम-नुसती (कुस्तीशिवाय) तालीम (१) तालीम करण्यापासून शक्ति वाढते, परंतु तिजपासून चापल्य व