पान:व्यायामशास्त्र.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ३ रा. व्यायामाची आवश्यकता मनुष्याच्या चळवळीची मुख्य साधने मेंदु व लातु हीं होत. विचार व प्रेरणा यांचे स्थान मेंदु आहे व मेंदूपासूनही प्रेरणा निघाल्यावर तिच्या योगाने चलन पावून क्रिया घडविण्याचे काम लायंचे आहे. म्हणून ही दोन्हीं इंद्रिये शक्तिमान् असणे जरूर आहे. तीं शक्तिमान् असण्यास त्यांचे योग्य पोषण झाले पाहिजे, व त्यांच्या क्रिया चालण्यासाठी त्यांना नेहमीं रांचा भरपूर पुरवठा झाला पाहिजे. अर्थात् ही दोन्ही कामे योग्य रीतीने होण्यास शरिरांत पुष्कळ रक्त पाहिजे, आणि ते रक्त शरिरांत एकसारखे खेळत राहिले पाहिजे. रक्त उत्पन्न करणे हैं काम पचनद्रियांचे आहे व शरिरांत रक्त जोराने खळविणे हे काम रक्ताशयरूपी बंबाचे आहे. रक्त एकदा शरीरातून हिंडून आले म्हणजे ते अशुद्ध व अपायकारक होते; म्हणून ते शुद्ध करण्याचे काम फुप्फुसांनी केले पाहिजे. याप्रमाणे प्राण्याची वळवळ चालण्यास जोरदार मेंदूखेरीज पचनेंद्रिये, फुफ्फुसे व व रक्ताशय ही इंद्रिये उत्तम प्रकारची पाहिजेत, असे दिसून येईल. म्हणून या इंद्रियांची सुस्थिति ज्या उपायाने राहील तो उपाय, प्राण्यांची चळवळ व त्यांची कर्तृत्वशक्ति वाढविण्यास कारणीभूत होईल हे उघड आहे. अशा प्रकारचा अद्वितीय उपाय व्यायाम होय. हे कसे ते पुढील. विवेचनावरून दिसून येईल.