पान:व्यायामशास्त्र.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


 रा. रा. रामचंद्र जनार्दन गोखले यांनी केलेलें व्यायामशास्त्र हे पुस्तक मी समग्र वाचून पाहिले. यांत व्यायामशास्त्रासंबंधी प्राचीन व अर्वाचीन • ग्रंथांच्या आधाराने व सँडो वगैरे तालीमबाज प्रोफेसरांच्या स्वानुभवाच्या आधाराने दिलेली व्यायामसंबंधी माहिती फार उपयुक्त आहे. व्यायामाला आवश्यक अशा आहार-विहारासंबंधानेही यांत चांगली चर्चा केली असून भाषा व लेखनसरणीही चांगली आहे. एकंदरीत यांत मराठी वाचकवर्गास बरीच उपयुक्त व महत्वाची माहिती मिळेल, यांत संशय नाहीं. 

पुणे, २६।८।०९ गणेश कृष्ण गर्दै,