पान:व्यायामशास्त्र.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२२]. क्रिया-- ह्याचे आकुंचन होते तेव्हा त्याची कमान कमी होऊन तो खाली जाते, व साफ आडवा होतो. यावेळी पोट वर येते. फरून त्याचे प्रसरण झाले, म्हणजे त्याचा मध्यभाग वर येऊन कमान होते. हा खाली गेला म्हणजे फुफ्फुसांना फुगण्यास वाव मिळतो व वर आला म्हणजे फुफ्फुसे दाबलीं जाऊन श्वास बाहेर पडतो. हा पडदा खाली जाते तेव्हां त्याचा दाव कोठा, आंतडी वगैरे पोटांतील इंद्रियांवर पडतो. आपण कुंथतांना हा मध्यपडदा लाली कां घालवितो याचे कारण वरील गोष्टीवरून समजून येईल. | छातीचे व खांद्याचे स्नायु, उ १. उरोज-[ पेक्टोरालस भेजर ] हा स्नायु सर्व छातीभर खांद्यापर्यंत पसरलेला आहे. क्रिया-दंड छातीकडे ओढणे हे या स्नायूचे मुख्य काम आहे. हात वर उचलला असेल तर तो खाली आणण्यास हा स्नायु विशाल स्नायूस मदत करता या स्नायूचे आकुंचन, व प्रसरण यांचे फुफ्फुसांचे आकुंचन-प्रसरणास साहाय्य होते. | उ. २ करपत्रक (=करवतासारखा) [ सेरेटस मॅझस. ] । क्रिया-हा स्नायु खवाटा पुढे ओढतो. यामुळे हाताने पदार्थ पुढे ढकलण्याच्या कामी याचा उपयोग होतो. स्क १. अधिस्कंध- { खांद्यावरील स्नायु ) [ डेल्टॉइड क्रिया-हात बाजूने वर उचलण्यास या स्नायूची मदत होते या स्नायूचा पुढला भाग, उरोज स्नायूचे साहाय्याने, हात पुढील