पान:व्यायामशास्त्र.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२१] प्रसंगी त्यांच्यावर दाब घालणे. मलमूत्रविसर्जन, वांति व प्रसूतिया प्रसंगी या स्नायूंचे आकुंचन होते; यामुळे शरिरांतील ते ते पदार्थ जोराने बाहेर लोटले जातात. ( या कामी त्यांना सध्यपडद्यचाही (डायाफ्रमचा ) उपयोग होतो. कुंथतांना मध्यपडदा आए खाली घालवून त्यास तेथे दाबून धरतो. ) । (२) पोट दाबून ( खाली करून ) मध्यपडद्यास वर जावयास मदत करणे. या योगाने श्वासोच्छ्वासास मदत होते. (३) झाडावर बगैरे चढतांना कमरेचा भाग वर ओढून घे. | ( ४ ) छाती अथवा ऊर खाली कमरेकडे ओढणे किंवा वांकविणे. ( ५ ) धड बाजूस फिरविण्यास मदत करणे. ह्या स्नायूंचीं व्यक्तिशः मुख्य कामे पुढे दिल्याप्रमाणे आहेत:- ऋजु कौक्षिकाचे आकुंचनाने छाती वांकविली जाते. | आंतर व बाह्य कौक्षिकाचे आकुंचनाने छाती बाजूकडे चळविली जाते. पोट व छातीचा वरचा भाग यांच्यामधील स्नायु. बरगड्यांमधील स्नायु-[ इंटरकॉस्टल मसल्स] यांच्या योगाने बरगड्या खाली वर होतात. यायोगाने श्वासोच्छवासास मदत होते. मध्यपडदा- ( डायाफ्रम ) फुफ्फुसे व कोठा यांचेमध्ये कमानीच्या आकाराचा जो मोठा स्नायुमय पडदा आहे, तो धडाच्या मध्यभागी आहे, म्हणून त्यास डायाफ्रम अथवा मध्यपडदा हें नांव दिले आहे. f