पान:व्यायामशास्त्र.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१७] असते. या योगाने एक अवयव विरुद्ध विरुद्ध दिशांनी वळू शकतो. हात, पाय, तोंडाचा खालचा जबडा, पापण्या, थड हीं वर खाली करितां येतात, ती अशा स्नायूंच्या जोडामुळेच. हात व पाय अनेक दिशांनी फिरवितां येतात याचे कारण त्या त्या दिशांनी ते अवयव फिरवितां यावे, यासाठी त्यांना त्या त्या वाजूंस स्नायु जोडले आहेत हे होय. शरिरांत जी जी म्हणून हालचाल होते, ती ती, स्नायूंच्या योगाने होते म्हणून सांगितलेच आहे. फुफ्फुसे व रक्ताशय, तसेच अन्ननलिकेचे भिन्न भाग यांचा संकोच-विकास होतो याचे कार ही इंद्रिये स्नायूंचे तंतूबी बनलेली आहेत हे होय. हात, पाय इत्यादि अवयवांतील नायु आपल्या इच्छेप्रमाणेच हालतात. परंतु काही स्नायूंचे काम स्वतंत्रपणे चालले असते. अन्ननलिका, फुफ्फुस, ब रक्ताशय यांचे स्नायु दुस-य प्रकारचे होत. पहिल्या प्रकारचे स्नायूंस इच्छावती किंवा इच्छाधीन स्नायु म्हणतात, व दुस-या प्रकारचे स्नायूंस अनिच्छावर्ती किंवा इच्छानधन स्नायु म्हणतात. स्नायु आकाराने कोट्याचे धोट्यासारखे असतात. म्हणजे ते मध्ये जाड असून दोन्ही टोकांकडे निमुळते असतात. दंड, मांडी, तंगडी यांचा आकार मध्ये जाड असतो याचे कारण त्या अवयवांमधील स्नायूंचा वरील प्रकारचा आकार हे होय. | अनेक बारीक तंतु मिळून स्नायु झालेला असता. स्नायूंच्या ’ि