पान:व्यायामशास्त्र.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १५ ] । तैलवाहिन्यांची तांडे केसाचे मुळांशी असतात. त्या एक प्रकारचा तेलकट पदार्थ बाहेर टाकीत असतात. त्या योगानें केसास व त्वचेस मऊपणा राहतो. त्वचेची कार्येः( १ ) आंतील इंद्रियांस आच्छादणे. (२) ज्ञानतंतूचे द्वारे स्पर्शज्ञान करावणे. ( ३ ) रक्तातील घाण घामाचे रूपाने बाहेर टाकणे. रक्तातील कार्यानिक आसिड टाकून हवेतील ऑक्सिजन घेणं, हे कामही त्वचा करते. म्हणजे फुफ्फुसांप्रमाणे त्वचाही श्वासोच्छ्वास करते. ( ४ ) घामाबरोबर पाणी कमी अथवा जास्त टाकून शुरराची उष्णता कायम ठेवणे. हे काम पुढील रीतीने होते. वाफ होऊन उडून जाणारा कोणताही पातळ पदार्थ शरिराचे भागास लावल्याने त्या भागास गारवा येतो, याचे कारण हे आहे कीं, वाफ होण्यास जी उष्णता लागते ती (उष्णता), तो पातळ पदार्थ आपल्या शरिरांतून घेतो. यामुळे शरिरांतील उष्णता कमी होऊन शरिरास गारवा येतो. | याच तत्वाचा उपयोग शरिराची उप्णता कायम राखण्यास प्रकृतीकडून करण्यात येतो. उदाहरणार्थ, उष्ण हवेने जेव्हां आंग वाघू लागते, तेव्हां त्यांतील पाणी घामाचे रूपाने बाहेर पडते. या घामाची जेव्हां वाफ होते, तेव्हा ती आंगची उष्णता घेऊनच होते. यामुळे शरिरांतल फाजील उष्णता कमी होऊन गारवा वाटतो.