पान:व्यायामशास्त्र.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२ ] सुक्ष्म नलिका असतात त्या एकमेकांस मिळून त्यांचे जाळे बनलेले असते; म्हणजे जेथे सूक्ष्म शुद्धरक्तवाहिन्या असतात तेथे त्यांना लागूनच व त्यांना जोडलेल्या सूक्ष्म अशुद्धरक्तवाहिन्याँ असतात. ह्या सूक्ष्म शुद्धरक्तवाहिन्या व अशुद्धरक्तवाहिन्या शारिराचे सर्व भागांत आहेत. रक्त सर्व शरीरांतून फिरत असतां यकृत् व प्लीहा उर्फ पानथरी व मूत्रपिंड या इंद्रियांतूनही जाते. ही इंद्रिये रक्तातील घाण । निरुपयोगी भाग काढून घेऊन ते शुद्ध करण्यास मदत करतात, मात्र पूर्वी सांगितलेले निळे रक्त तांबडे करण्याचे सामथ्य यः इंदियाचे अंग नसते. निळ्या रक्ताचे तांबडे रक्त करणे हे काम फुफ्फुसेच करू शकतात. यकृत् जो भाग रक्तांतून घेते, त्यापासून पित्त हा पाचक रस तयार करते. फुफ्फुसे. छातीमध्ये जी पोकळ जागा आहे, तिजमध्ये फुफ्फुसे व उक्ताशय एवढच इंद्रिये आहेत. रक्ताशयाचा आकार साधारणपणे मठीएवढा असतो, तेव्हां एवढी जागा खेरीजकरून बाकीचा लातीचा बहुतेक भाग फुफ्फुसांनी भरला आहे. फुफ्फुसे दोन असून छातीच्या दोन्हीं आंगास आहेत, व त्यांच्यामध्ये, खालच्या आंगास, डावे बाजूला रक्ताशय आहे. फुफ्फुसांचा आकार साधारणपणे शंकूसारखा आहे. म्हणजे ती खाली रुंद असून वर निमुळतीं होत गेली आहेत. प्रत्येक फुफ्फुसाचे वजन सुमारे पक्का सवाशेर असते.