पान:व्यायामशास्त्र.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[३] स्थापन करण्यांत खर्च करीत नाहीत, यावरून या विषयासंबंधा लोकांची काय कल्पना असावी हे स्पष्ट होत आहे. असो, पूर्व सांगितल्याप्रमाणे केवळ आरोग्य किंवा रोगाभाव याचे पलीकडील एक श्रेष्ठ शारीरिक स्थिति आहे, व औषधे घेऊन विकारमुद होण्याची जी हल्ली आपण महत्वाकांक्षा धरतो, तिच्या ऐवजी वरील स्थिति प्राप्त करून घेण्याची महत्वाकांक्षा आप धरिली पाहिजे. ही महत्वाकांक्षा साध्य करून घेण्याचा उपाय व्यायाम ह। होय. शारीरिक संपत्ति प्राप्त करून देणा-या सर्व उपायांत हा उपाय श्रेष्ठ होय. औषधे, उत्तम अन्न, उत्तम हवापाणी यांनी प्रकृतींतील विकार जातील. पण या पलीकडचे दुध व्यायामावांचून उत्पन्न होणार नाहींत. म्हणून शारीरिक संपाचे संपादन करू इच्छिणान्यांनी व्यायामाकडेच विशेष लक्ष दिले पाहिजे,