पान:व्यायामशास्त्र.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनास्थेचे.आपल्या राष्ट्राच्या कल्याणाकरितां आपली सर्व संपत्ति राष्ट्रास अर्पण करणारा प्रसिद्ध देशभक्त न्होड्स याने इंग्लिश विद्यार्थ्यांकरितां ज्या स्कॉलशिंपा ठेवल्या आहेत, त्या मिळविण्याकरितां लागणाच्या गुणांमध्ये ३ गुण विद्वत्तेस व २ गुण शारीरिक संपत्तीसाठी ठेवले आहेत.* ह्यावरून व इंग्लिश विद्यार्थी व सामान्यतः इंग्लिश लोक व्यायामाकडे किती लक्ष देतात ह्यावरून या विषयाचे महत्त्व किती आहे, हे सहज दिसून येणारे आहे. अशी स्थिति असतांना, या विषयाकडे लोकांचे दुर्लक्ष असावे, ही गोष्ट खरोखरी फार वाईट आहे. ज्या विद्यार्थ्यांवर हिंदुस्थानचा भावी उत्कर्ष अवलंबून आहे, त्यांच्यामध्ये निरोगी व धष्टपुष्ट मुलांचे प्रमाण काय असते,आणि शाळा व कॉलेजें यांत शिकणाच्या मुलांमध्ये आट्यापाट्या, क्रिकेट इत्यादि खेळ खेळणा-या किंवा तालीम करणा-या मुलांचे प्रमाण किती अल्प असते, ह्यावरून शारीरिक संपत्तीचा हास कसा होत चालला आहे, हे सर्वांस माहीत आहेच. केवळ व्यवहाराच्या दृष्टीने पाहतांही, पोट भरण्यासाठी जी विद्या शिकावी लागते, तिच्या इतकीच, भावी | *केवळ विद्वत्ता किंवा घोकंपट्टी पाहून स्कॉलार्शप देण्याची पूर्वी पद्धति होती; परंतु ती पद्धति चुकीची होती, असे विचारी लोकांस वाटू लागले आहे. विद्वत्तेइतक्याच किंबहुना जास्त महत्त्वाच्या गोष्टी, शील व शारीरिक संपत्ति ह्या आहेत. म्हणून विद्यार्थ्यांची योग्यता ठरवितांना ह्या गोष्टी लक्षात घेणे अवश्य आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच सेसिल व्होडस ह्या देशभक्ताने स्कॉलशिंपा मिळण्याला लागणारे गुण ठरविले आहेत. हे गुण, व एकंदर १० पैकी त्यांस ठेवलेले मार्क पुढील प्रमाणे आहेत:-केवळ विद्वत्ता ३ मार्क,शील३मार्क, मानसिक धैर्य, लोकाप्रणीत्व......वगैरे गुण २ माक, व शारीरिक संपत्ति२ मार्क ह्यावरून केवळ पुस्तकी विद्वत्ता किंवा घोकंपट्टीचे कौशल्य पाहून तेवढ्याच गुणावर स्कॉलर्शिप देण्याची आपल्या इकडे जी वहिवाट आहे, ती कितपत बरोबर आहे, याचा लोकांनी विचार करावा.