पान:व्यायामशास्त्र.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हास सर्व बाजूंनी झपाट्याने चालला आहे, त्यास अंशतः प्रतिबंध करण्याचे श्रेय घ्या. . ज्याप्रमाणे एकाद्या गांवांतील दुकानांचे स्वरूपावरून तेथील व्यापाराचे स्वरूपाची कल्पना होते, त्याप्रमाणे असेही म्हणतां येईल की, एकाद्या देशांतील वर्तमानपत्रांतील जाहिरातींवरून त्या देशांतील लोकांच्या गरजांची व त्यांच्या रुचीची कल्पना होते. आमच्या इकडील वर्तमानपत्रे पाहिली तर त्यांच्या जाहिरातींपैकी निम्या जाहिराती औषधांच्या असतात, व औषधांच्या जाहिराती जी जागा अडवितात, तिचा निमा भाग संसर्गजन्य रोगांवरील औषधांच्या व कामोत्तेजक गुटिकांच्या जाहिरातींनी अडविलेला असतो. बरें पुस्तकांच्या जाहिराती पहाव्या, तर त्यांमध्येही कादं. ब-या व नाटके यांचीच गर्दी असते; परंतु ह्या एवढ्या जाहिरातींच्या बाजारांत शारीरिक संपत्ति वाढविण्याचे साधन काचतच दृष्टीस पडते. गिझनीच्या महंमदाने हिंदुस्थानावर स्वारी केल्यापासून पारतंत्र्य व दारिद्य यांचा अनुभव (कमीजास्त मानाने )जें राष्ट्र घेत आहे, त्यांतील लोकांना वरील प्रकारच्या औषधांची किंवा नाटके व कादंब-या यांची इतकी आवश्यकता वाटावी व व्यायामाच्या साधनांची,व्यायामशास्त्रावरील पुस्तकांची किंवा व्यायामशालांची आवश्यकता भासू नये,ह्यापेक्षा जास्त खेदकारक गोष्ट ती कोणती ? चहाकाफींची दुकानें व हेअरकटिंग सलून्स यांची संख्या श्रेढीने वाढत जात असतांना पूर्वीच्या व्यायामशाला बुडत जाव्या, व ज्या मराठी भाषेत हल्ली दरवर्षी सुमारें २।३ शें ग्रंथ उत्पन्न होतात, त्या भाषेत आजपर्यंत व्यायामशास्त्रावर एकही ग्रंथ होऊ नये, ही गोष्ट अत्यंत खेदकारक व लाजिरवाणी नाहीं काय? ही गोष्ट कशाचे द्योतक आहे? अर्थात् शारीरिक संपत्तीविषयीच्या