पान:व्यायामशास्त्र.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १३४ ] व्यायाम झाल्यावर, आरंभी सांगितलेल्या प्रकाराने आळस देऊन व्यायाम पुरा करावा. या पद्धतीचे गुणदोषः-गुण-(१) ( २ ) ( ३ ) सँडोच्या पद्धतीप्रमाणेच. ( ४ ) स्नानानंतर आंग जोराने पुसणे व व्यायाम करताना योग्य प्रकारे श्वासोच्छ्वास घेणे यास महत्त्व दिले आहे. दोष--( १ ) (२) सँडोप्रमाणेच. ( ३ ) ही व्यायामपद्धति समजण्यास जास्त अवघड आहे. | प्राणायामाविषय मूलरचे मत व्यायामावांचून केवळ प्राणायाम निरुपयोगी आहे. प्राणायाम फाजील केल्याने अपाय होण्याचाही सन आहे. सशक्तांनी व्यायाम करीत असतां श्वास घेतांना , टांचा उचलाव्या, मागें न्यावे, कोपरे मागें न्यावीं व खांदेही उचलावे. स्नान--मूलरच्या मताप्रमाणे व्यायामानंतर सशक्तांनीं शीतस्नान १ इतरांनी सोसेल त्या प्रकारचे स्नान करणे अवश्य आहे. स्नानानंतर खरखरीत रुमालाने आंग चांगले पुसावें. आंग पुसतांनाही शरिराचे निरनिराळे भाग वाकवून त्यांना व्यायाम कसा देता येईल, हें मूलरने दाखविले आहे. समाप्त.