पान:व्यायामशास्त्र.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १३३ ] थोडेसे पुढे वांकविल्याने श्रम जास्त होतात. नंतर पुढला पाय मागें व मागला पाय पुढे ठेऊन व तळहाताची दिशा बदलून पूर्वीच्या उलट दिशेने हात फिरवावे. व्यायाम ६ वा. पूर्व तयारी–जमिनीवर उताणे निजावे व पाय ताठ करून ते जमिनीपासून थोडे वर उचलावे. ५ व्या व्यायामांतील हाताप्रमाणे पाय ८ वेळां वाटोळे फिरवावे. प्रत्येक वतुलाचा व्यास सुमारे १॥ हाताचा असावा. शेवटची दोन वर्तुले शक्य तेवढी मोठी घ्यावी. असेच उलट दिशेने पाय ८ वेळां फिरवावे. पाय जवळ जवळ आले म्हणजे श्वास घ्यावा व दूर जातांना श्वास सोडावा. अशक्त लोकांनी दोन्ही पाय एकदम न फिरवितां एक एक आळीपाळीने फिरवावा. व्यायाम ७ वा. पूर्व तयारी-पावलांमध्ये सुमारे दीड हात अंतर ठेवून उभे रहावे. हात ताठ पसरावे व हाताच्या मुठी मिटाव्या. धड पुढील बाजूस थोडे वांकवावे. | धड हळूच डावीकडे फिरवीत फिरवीत पूर्वी जिकडे तोंड होते, तिकडे पाठ होईपर्यंत धड वाटोळे फिरवावे. उजव्या बाजूकडे पाठ होतांना पाठीस आणवेल तितका बांक आणावा. अशा स्थितीत क्षणभर राहिल्यावर धड पुढील बाजूस वांकवावे, व फिरून ते उजवीकडे फिरवून पाठीला मागील बाजूने बांक आणावा. नंतर फिरून पुढील बाजूस ओणवे होऊन डावीकडे चळावे. व्यायाम ८ वा. ( सँडोच्या १२ व्या व्यायामाप्रमाणेच. ) हा व्यायाम १२ वेळा करावा. अशक्त लोकांनी जमिनीस गुडघे टेकू द्यावे व सहज उठतां येईल इतकीच छाती खाली आणावी. खाली येतांना श्वास घ्यावा व वर जातांना श्वास सोडावा.