पान:व्यायामशास्त्र.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

णाच्या सर्व विचारी लोकांनी हा न्हास थांबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्न म्हणजे लोकांमध्ये शारीरिक संपत्ताची आवड उत्पन्न करणे व ती प्राप्त करून घेण्याच्या साधनांची माहिती करून देणे हा होय. । शारीरिक संपत्ति प्राप्त करून घेण्याचे जे मार्ग आहेत, त्यांत व्यायाम हा प्रमुख मार्ग आहे. ही गोष्ट लोकांस माहीत नाहीं असें नाहीं; परंतु अलीकडे लोकांमध्ये जी एक प्रकारची उदासीनता व शिथिलता आली आहे, तिच्यामुळे इतर महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणे या गोष्टीसंबंधाचेही आपले कर्तव्यकर्म लोक विसरले आहेत. आता, पूर्वीप्रमाणे, मुलगा योग्य वयांत आल्यावर त्यास त्याचे पालक तालमींत पाठवीत नाहीतच, पण पूर्वी ब्राह्मणांच्या घरांमध्ये सूर्योपासनेच्या निमित्ताने नमस्कार घालण्याची जी चाल असे, तिचाही आतां बहुतेक लोपच झाला आहे. आपला धर्म व आपल्या इतर प्राचीन सामाजिक संस्था यांचे उत्कृष्टपणाची जे लोक प्रशंसा करतात, त्यांची मुलेही सूर्योपासनेस पारखी झाली आहेत. ही स्थिति अत्यंत खेदकारक आहे. आमचा तात्त्विक धर्म व प्रत्यक्ष धर्माचरण, व तसेच आमची वाणी व कृति यांमध्ये जी विसंगतता दृष्टीस पडते व ज्या विसंगततेमुळे आम्ही तेजोहीन झालो आहोत, त्या विसंगततेचेच एक लहानसे उदा. हरण ही गोष्ट आहे. असो; अशी स्थिति आहे, म्हणून लोकांस एवढीच विनंति आहे की, प्रस्तुत पुस्तकांत व्यायामाचे देशी व विदेशी जे प्रकार सांगितले आहेत, त्यांपैकी कोणताही प्रकार आपणांस पसंत न पडल्यास, निदानीं, आपल्यांमधील नमस्काराची जी चाल आहे, ती तरी आपण चालू ठेवा व ब्रह्मचर्य, लष्करीपेशा, यांचा अभाव व दारू, नाटके, इत्यादि चैनी यांनी शारीरिक संपत्तीचा जो