पान:व्यायामशास्त्र.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऐहिक सुखास शारीरिक संपत्तीची किती आवश्यकता आहे याचे प्रत्यक्ष उदाहरण पाहणे असल्यास ते आपल्या राज्यकर्त्यांचे आहे. इंग्लिश लोक जें ऐश्वर्य व सौख्य उपभोगत आहेत, ते त्यांना प्राप्त होण्यास त्यांचे कोणते गुण कारणीभूत झाले आहेत, याचा विचार केला, तर त्या गुणांमध्ये उत्कृष्ट शारीरिक संपत्ति हा गुण प्रमुख आहे असे आढळून येईल. इंग्लिश लोक जगाच्या वाटेल त्या भागांत राहण्यास, वाटेल ते श्रम करण्यास, आणि वाटेल तेव्हां संग्राम करण्यास तयार असतात, याचे एक कारण त्यांची अलौकिक शारीरिक संपत्ति हैं। आहे. शिवाय असेही आढळून येईल की, आजपर्यंत जे जे लोक राज्यकर्ते म्हणून जगात प्रसिद्ध होऊन गेले, ते ते सर्व शारीरिक संपत्तीविषयी प्रसिद्ध होते. उलट असेही दिसून येते की, ज्यांच्यामध्ये शारीरिक संपत्ति कमी आहे, अशा लोकांनी आजपर्यंत कोणतीही मर्दानीपणाची गोष्ट केली नाहीं. हिंदु लोक बुद्धिमान् असूनही संपात्त व सामर्थ्य या बाबतीत मागसलेले आहेत, याचे कारण त्यांच्यातील शारीरिक संपत्तीचा अभाव हे एक आहे. दर्यावर्दपणा, लष्करी नोकरी, परदेशी वसाहत करणे, खाणी, व कारखाने चालविणे, इत्यादि राकटपणाची कामे करण्यास इतर लोक जसे पुढे हातात, तसे हिंदु: लोक होत नाहीत. यांचे कारण काय हे पाहू गेले असतां, ते उत्साहशक्तीचा अभाव हेच बहुधा दिसून येईल. आतां उत्साहशक्ति आरोग्याचा अनुषंगी गुण आहे; म्हणून आरोग्य अथवा शारीरिक संपत्ति ही गोष्ट सर्व दृष्टींनी मनुष्यमात्रास फार महत्त्वाची आहे. याप्रमाणे ऐहिक सुख व पारमार्थिक सुख ह्या दोहोंच्या दृष्टीनेही शारीरिक संपत्तीची आवश्यकता आहे. म्हणून ह्या संपत्तीचा हात असलेला हास थांबविणे अत्यंत इष्ट आहे. यास्तव आत्मोन्नति करू इच्छि