पान:व्यायामशास्त्र.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ११२ ] शरिरास विनाकारण श्रम पडून अपाय होतो. याकरित शरिरास पाहिजे तेवढीं भिन्न द्रव्यें अन्नापासून मिळविण्यास त्यांचे योग्य रीतीने मिश्रण केले पाहिजे. ह्यासाठीच प्रत्येक दिवशीच्या आहारांत, भात व भाकरी मिळून ५०-६० तोळे, डाळ १० तोळे, तूप किंवा तेल २-५ तोळे व दूध अच्छेर ह्या प्रमाणांत निरनिराळे पदार्थ असणे जरूर आहे. १. निरनिराळ्या अन्नांची पचनीयता:-अन्नाच्या भिन्न घटक भागांसंबंधाने ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, त्या सर्वांची पचनीयता सारखी नसते. म्हणजे कांहीं अन्नांतील कांहीं भाग पचनास हलके असतात, तर काहींतील जड असतात. उदाहरणार्थ, दधांतील मांसोत्पादक भाग पचनास फार हलका आहे, परंतु डाळींतील मांसोत्पादक भाग पचनास फार जड अहे. तसेच तप पचण्यास हलके आहे; परंतु त्या मानाने तेल जड आहे. शरिरास एखाद्या अन्नापासून फायदा होणे, हे त्या अन्नाचे योग्य पचन होण्यावर आहे. म्हणून एखाद्या अन्नापासून शरिरास किती फायदा होईल हे ठरविण्यास त्यांतील पोषक द्रव्यांच्या पचनीयतेचा विचार केला पाहिजे. | मांसोत्पादक भागाच्या पचनीयतेसंबंधाने निरनिराळ्या पदाथंचे नंबर पुढे लिहिल्याप्रमाणे आहेत. दूध, गहू, मूग, वाटाणा, मसूर, उडीद, वाल, हरबरा, तूर. पचनीयतेसंबंधाने स्निग्ध अन्नांचे नंबर पुढलि प्रमाणे आहेत. तूप, तिळाचे तेल, करडईचे तेल, इतर तेलें.. ......