पान:व्यायामशास्त्र.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १११ ] मनुष्याच्या आहारांत निरनिराळ्या अन्नांचे काय प्रमाण असावें ?—मनुष्याच्या अंगांतून जे पदार्थ मलरूपाने बाहेर पडतात, त्यांचे रसायनरीत्या परीक्षण केले असता, त्यांत स्थूलमानाने पुढील भाग दिसून येतातः-४॥ हजार ग्रेन कार्बन व ३०० शें ग्रेन नायट्रोजन. | भिन्न अन्नांमध्ये कार्बन व नायट्रोजन यांचे प्रमाण काय असते यासंबंधाने वर जी माहिती दिली आहे, तिजवरून असे दिसून येईल की, बराबर ४।। हजार ग्रेन कार्बन व ३०० शें ग्रेन नायट्रोजन ज्यापासून मनुष्यास मिळेल असे एकही अन्न नाहीं. बहुतेक अनें अशी आहेत की, त्यांतून कार्बन किंवा नायट्रोजन यांपैकी एक पदार्थ आपणांस हवा तेवढाच मिळावा अशा प्रमाणाने ते घेतले, तर दुसरा पदार्थ आपणांस पाहिजे त्यापेक्षा कमी मिळेल किंवा ज्यास्त मिळेल. उदाहरणार्थ, गव्हाचे चपातींत कार्बन व नायट्रोजन यांचे प्रमाण ३०: १ असल्यामुळे, ३ शें ग्रेन नायट्रोजन मिळेल इतकी चपाती खाल्यास, ९००० ग्रेन कार्बन-म्हणजे पाहिजे त्यापेक्षां ४॥ हजार ग्रेन कार्बन जास्त–पोटांत जाईल. तेच, मांसांत कार्बन व नायट्रोजन यांचे प्रमाण ७: २ असल्यामुळे, ३ ॐ ग्रेन नायट्रोजन मिळेल इतके मांस खाल्ले, तर १०५• ग्रेन कार्बन -म्हणजे पाहिजे त्यापेक्षां सुमारे ३॥ हजार ग्रेन कमी (कार्बन)-पोटास मिळेल. हाच आक्षेप अन्नाच्या इतर प्रकारांसही लागू आहे. आतां पूर्वी सांगितलेच आहे की, अन्नांतील केवढ्या द्रव्याचे रक्तमांस बनावयाचे यासंबंधानें मर्यादा ठरलेली आहे; यामुळे या मर्यादेबाहेर एखादे द्रव्य शरिरात गेले तर ते बाहेर टाकून देण्यास