पान:व्यायामशास्त्र.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्ञानासही शारीरिक संपत्तीची अवश्यकता आहे. प्रयत्नामुळे ज्ञानाचा वृद्धि झाली आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. व्यास, पाणिनी, शंकराचार्य, भास्कराचार्य, अरिस्टॉटल, गैलिलियो, बेकन, डार्विन, स्पेन्सर यांना ते ते ग्रंथ लिहिण्यास किती अध्ययन, अवलोकन, मनन व शारीरिकश्रम करावे लागले असतील, याचा विचार केला म्हणजे ज्ञानवृद्धीस श्रमाची किती आवश्यकता आहे हे दिसून येईल. उल्लसित मनोवृत्ति, शांतता व आरोग्य या गोष्टींचाही शारीरिक संपत्तीशी निकट संबंध आहे. निरोगी मनुष्याची चित्तवृत्ति उल्लसित असते व तो दुर्मुखलेला फारसा असत नाही, ही गोष्ट सर्वमान्य आहे. तसेच जगामध्ये दुष्ट लोकांची जी खटपट चालू असते, तिला आळा घालण्यास त्यांशी संग्राम करून त्यांना दाबून टाकणे आवश्यक असते; व ही गोष्ट शारीरिक संपत्तीवांचून होणे शक्य नाही. म्हणून ती साध्य करण्यासही शारीरिक संपत्तीची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे सौख्यासही आरोग्याची आवश्यकता आहे. आरोग्य नसेल तर किती दुःख होते याचा अनुभव सवास आहेच. तेव्हा या सर्व गोष्टी । लक्षात घेतल्या असतां, ऐहिक सुखास शारीरिक संपत्तीची अत्यंत आवश्यकता आहे, हे कोणासही कबूल करावे लागेल. | [ मागील पृष्ठावरून पुढे चालू. ] Athletics & good health Athletics.& intelligence Athletics & quick temper, Athletics & popularity. 33 Karl Pearson, in the Prefatory Essay to the 32 nd Vol. of the Encyclo paedia Britannica.

  • 46

•21

  • 22