पान:व्यायामशास्त्र.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १०९] अन्नांमध्ये हे दोन्ही भाग कमीजास्त प्रमाणाने असतात हे लक्षांत ठेवले पाहिजे. मांसोत्पादक ( अथवा नायट्रोजनविशिष्ट ) अन्नाचे मुख्य प्रकार पुढील होत.–मांस, अंडी, दूध, सर्व द्विदल धान्ये. | उष्णतोत्पादक ( अथवा कार्वनमय ) अन्नाचे मुख्य प्रकार ( १ ) सर्व पिष्टमय धान्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी ....इ० ( २ ) सर्व पिष्टमय कंद आणि मुळे व त्यांपासून तयार केलेली पिष्टे -बटाटे, रताळी, तवकील, साबूदाणा....इ० ( साबूदाणा ज्या पिठाचा केलेला असतो ते पीठ ‘सागो' नांवाच्या झाडाचे खोडांत सांपडते. ) ( ३ ) शर्करामय पदार्थ-साखर व ज्यांत साखर आहे असे सर्व पदार्थ. ( ४ ) सर्व प्रकारचे डिंक. (५) स्निग्ध पदार्थ-तूप, चरबी, व सर्व प्रकारची तेलें. क्षारमय अन्न.--मीठ केवळ क्षारमय आहे. खाण्याच्या पदार्थांमध्ये केवळ क्षारमय असा दुसरा पदार्थ नाहीं. क्षार थोड्या प्रमाणाने फळे, भाजीपाला, मांस, अंडीं व धान्ये यांतही सांपडतो. उष्णतोत्पादक अन्नांपैकी स्निग्ध पदार्थांपासून शाररास उष्णतेचा पुरवठा फार लवकर होतो व त्यांचे खालोखाल शर्करामय पदार्थांपासून होतो. म्हणून उष्णतोत्पादक अन्नांत हे प्रकार विशेष महत्त्वाचे होत. या कारणास्तव ह्या भागांचा निर्देश पृथपणे केला जातो. निरनिराळ्या अन्नांतील मांसात्पादक भागास इंग्रजीत जीं, निरनिराळी नांवें दिली आहेत, ती पुढे सांगितली आहेत. ..