पान:व्यायामशास्त्र.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १२ वा. -S*s- अन्नअन्नाचे प्रकार.–शरिरांत जी नित्य झीज होते व जी घाम,मूत्र, उच्छ्वास इत्यादि, मलरूपाने निघून जाते, तिजमधील बराच भाग कार्बनमय असतो, थोडा भाग नायट्रोजनमय असतो व फार थोडा भाग क्षारमय असतो. म्हणून हीं द्रव्ये शरिरास पुरवण्याकरितां आपल्या आहारांत पुष्कळसे कार्बनमय द्रव्य, थोडे नायट्रोजनमय द्रव्य व थोडे क्षार असले पाहिजेत. आपल्या शरिरांतील मांसांत मुख्य विशिष्ट द्रव्य नायट्रोजन होय. हा नायट्रोजन पुरविणारा अन्नाचा जो नायट्रोजनविशिष्ट भाग असतो, त्यांस मांसोत्पादक द्रव्य म्हणतात, व ज्या अन्नांत हा भाग विशेष असतो, त्या अन्नांना मांसोत्पादक अन्न म्हणतात. आपल्या शरिरास अवश्य लागणारी उष्णता उत्पन्न होतांना व निरनिराळ्या भागांचे चलन होत असतांना शरिरांतील जे घटक द्रव्य जळत असते, ते मुख्यतः कार्बनमय असते. म्हणून हैं। कार्बनमय द्रव्य शरिरास पुरविणाच्या अन्नास कार्बनमय अन्न अथवा उष्णतोत्पादक अन्न म्हणतात. । | ज्या अन्नांत मांसोत्पादक भाग विशेष असतो, त्यांस मांसो: त्पादक अन्न व ज्यांत उष्णतोत्पादक भाग विशेष असतो त्यास उष्णतोत्पादक अन्न म्हणण्याचा प्रचार आहे. परंतु बहुतेक