पान:व्यायामशास्त्र.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १०६ ] पातळ पदार्थ यांतील पाण्याचा बहुतेक भाग मूत्राच्या द्वारेंच जावयाचा असतो. म्हणून निजतांना अशा पदार्थाचे सेवन केल्याने रात्रीं मूत्राशय मूत्राने भरून जातो; व तो भरून गेला म्हणजे त्याचा भार शेजारच्या वीर्याशयावर पडून त्या इंद्रियांत चेतना उत्पन्न होऊन वीर्य स्थानभ्रष्ट होते. या कारणाने कधी कधीं वीर्यस्खलन होते. निजण्याचे पूर्वी दोन तास पाणी प्याले म्हणजे या पाण्याचा बराच अंश निजण्याचे पूर्वी केलेल्या मूत्रोत्सर्गाबरोबर निघून जातो, व त्यायोगे वरील प्रकारची भीति राहत नाहीं. । ६. कृमि अथवा जंत होऊ देऊ नयेत. कृमींनीं बद्धकोष्ठता उत्पन्न होते. शिवाय कृमीच्या चळवळीमुळे पोटाचे खालचे भागांत क्षोभ होतो. या क्षोभामुळेही वीर्यस्खलन होते. म्हणून पोटांत कृमि झाले असल्यास कृमिहारक औषधे घेऊन त्यांचा नाश करावा. ७. पाठीवर उताणें निजू नये. या स्थितीमध्ये वीर्याशयावर मूत्राशयाचा भार पडतो; म्हणून ही शरीर स्थिति स्वप्नावस्था होण्यास अनुकूल आहे. याकरितां पाठीमागें गांठ येईल अशा रीतीने एखादा रुमाल किंवा फडके कमरेस बांधावे; म्हणजे झोपेतही उताणे निजतां येणारच नाहीं. मोकळ्या हवेत निजावें व अंगाखाली अथवा अंगावर फार ऊबदार कपडे घेऊ नयेत. कोंदट हवेत निजल्याने झोंप गाढ न येतां स्वप्नयुक्त येते. तसेच अंगावर फार पांघरुणे घेतल्याने वाजवीपेक्षा जास्त ऊब उत्पन्न होते व कधी कधी झोंप पुरेशी झाल्यावरही केवळ कपड्यांचे उबेमुळे सकाळी जास्त झोंप लागते. ही झोंप स्वप्न