पान:व्यायामशास्त्र.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ १०५ ] आंतड्याचा भार वीर्याशयावर पडून रतस्खलन होते. म्हणून मलाद्ध करणारे औषध जरूरीप्रमाणे आठवड्यांतून २।४ वेळां घेऊन कोठा साफ ठेवावा. रात्रीं निजण्याचे पूर्वी शौचास जाऊन यावे. त्यायोगाने आंतडी हलकीं राहतात. कोठा साफ ठेवण्यास त्रिफळाचूर्ण फार उपयोगी आहे. | ३. सर्व जड, उष्ण, उत्तेजक व वातुल पदार्थ खाण्याचे टाळावे. उसळी, डाळी, थालिपिटें, कडबोळी, भजीं, कांद्याचे व लसणाचे पदार्थ यांनीं बद्धकोष्टता उत्पन्न होते; म्हणून असे पदार्थ-विशेषतः रात्री–खाऊ नयेत. ४. रात्री लवकर जेवावे. जेवणानंतर दोन तास जागे राहून नंतर निजतां येईल इतकें आधीं जेवावे. झोप लागल्यावर शरिरांतील सर्व व्यापार मंद होतात; अर्थात् पचनक्रियाही मंद होते. म्हणून भोजन झाल्यावर लवकर निजल्याने पचनक्रिया चांगली होत नाहीं ! भोजनोत्तर दोन तास जागल्याने, तेवढ्या वेळांत, पचनक्रियेचा बराच भाग होऊन गेलेला असतो. म्हणून त्यानंतर निजल्याने पचनक्रियेचे कामास विशेष प्रतिबंध होत नाहीं. जेवणानंतर लवकर निजल्याने अन्नपचन बरोबर होत नाहीं. त्यामुळे झोपेत स्वप्ने पडतात व बद्धकोष्ठता उप्तन्न होते. स्वप्नांतील उच्छृखल विचार, व अपचनामुळे होणारी बद्धकोष्ठता या गोष्टी ब्रह्मचर्यभंगास अनुकूल आहेत; म्हणून त्या योगाने स्वप्नावस्था होते. ५. रात्रीं निजण्यापूर्वी २ तासपर्यंत पाणी किंवा दुसरा कोणताही पातळ पदार्थ पिऊ नये. पाणी अथवा दुसरा कोणताही