पान:व्यायामशास्त्र.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १०४ ] दुसरे कोणतेही जोराचे विचार येत नाहीत व त्यास गाढ झोप लागते. शिवाय शाररांतील शक्तीचा व्यय व्यायामाने होणारी झीज भरून काढण्यांत रात्रौ झाला, म्हणजे दुस-या कोणत्याही प्रवृत्तीस विशेष सवड राहतच नाही. म्हणून व्यायामाने ब्रम्हचर्याचे रक्षण होते. व्यायामानें तारुण्य उशीरा येते, ही गोष्ट अनुभवसिद्ध व वैद्यशास्त्रसंमत आहे. यावरून ब्रह्मचर्य राखण्यास व्यायामाचा उपयोग किती होतो हे दिसून येईल. तारुण्य उशीरा आल्याने आयुष्याच्या इतर अवस्थाही उशीरां येतात व अर्थात् त्यायोगे आयुर्मर्यादा वाढते. हा त्यापासून विशेष फायदा आहे. स्वप्नांत वाईट विचार येऊन ज्यांच्या ब्रह्मचर्याचा भंग होतो त्यांचेकरितां नियमः १ कामोत्तेजक विचार टाळण्याचा प्रयत्न केल्याने कधीं कधी ते विचार जोराने मनांत शिरू लागतात. यास्तव असे विचार टाळण्यास हा उपाय आहे की, ते विचार ज्या वस्तूंच्या दर्शनाने किंवा ज्या प्रसंगाने उत्पन्न होतात त्या वस्तु व ते प्रसंग टाळावे, व ज्यामध्ये आपले मन रमेल अशा दुस-या एकाद्या विषयाचा ध्यास घ्यावा. खेळ, तालीम, गायन, एखादी हस्तकौशल्याची कला किंवा एकादा शास्त्रीय विषय यांपैकी ज्यांमध्ये आपणांस विशेष गोडी वाटत असेल त्याचा अभ्यास करावा; म्हणजे या विषयाचे विचाराने मन भरून गेले म्हणजे इतर विचार मनांतून निघून जातील. २. कोठा साफ ठेवावा. मलावष्टंभ झाल्याने मलाने भरलेल्या