पान:व्यायामशास्त्र.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १०३ ] लग्न होऊन सहधर्मचारिणीची गांठ पडे तोंपर्यंत मूत्रोत्सगावांचून कोणत्याही अन्य हेतूने जननेंद्रियास हात लावणे, अत्यंत निंद्य व अपायकारक आहे ही गोष्ट, योग्य कालीं, मुलांचे मनांत त्यांचे पालकांनी बिंबवावी. ब्रह्मचर्य राखण्यास पुढील गोष्टी आवश्यक आहेतः उत्तेजक आहाराचे सेवन करू नये. उत्तेजक आहाराने कामेच्छा वाढते व भलतेसलते विचार मनांत येतात, म्हणून अशा आहाराचे सेवन करू नये. तिखट, मसाले, कांदा, लसूण, चहा, काफी, तंबाकू वगैरे पदार्थ, सर्व प्रकारची मद्ये व मांसें उत्तेजक आहेत. म्हणून हे पदार्थ विद्याथ्र्यांना वय होत. तसेच खोबरें, दूध व डाळी यांचे मर्यादेबाहेर सेवन झाले, तर ते पदार्थही ब्रह्मचर्यभंगास कारण होतात. म्हणून त्यांचंही परिमित सेवन करावे. शृंगारविषयक कोणत्याही गोष्टीचे चिंतन किंवा चर्चा करू नये. या गोष्टींचे चर्चेने किंवा ध्यानानें वासना जागृत होऊन वीर्य स्थानभ्रष्ट होते, म्हणून त्या टाळाव्या. अर्थात् नाटके, तमाशे वगैरेही वर्त्य समजावे. | निजण्यापूर्वी परमेश्वराचे किंवा एकाद्या पृज्य विभूतीचे चिंतन करावे.--निजण्यापूर्वी जे विचार मनात घोळत असतात, त्यांचा झोपेमध्येही आपल्या मनावर परिणाम होतो. म्हणून झोपेत भलते विचार मनामध्ये येऊ नयेत याकरितां, निजण्याचे पूर्वी ईश्वराचे किंवा दुस-या एकाद्या पूज्य विभूतीचे चिंतन करावे. | पुरेसा थकवा येईल इतका मोकळ्या हवेत सायंकाळी व्यायाम घ्यावा--व्यायामाने मनुष्य थकला म्हणजे त्याचे मनांत