पान:व्यायामशास्त्र.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १०२ ] असे मुळीच दिसत नाहीं. तेव्हां वीर्यनिरोध करून जन्मभर संन्याशी रहा, असे सांगण्याचा आमचा उद्देश नाहीं. गृहस्थाश्रम मनुष्यास आवश्यक आहे व तो सुखावह आहे, असेच आमचे मत आहे. पण आम्हांस सांगावयाचे ते एवढेच कीं, गृहस्थाश्रम जरी सुखावह आहे तरी त्यामध्येही स्त्रीसंबंधाचे सुख मनुष्याने किती घ्यावे यास सृष्टिनियमांनी मर्यादा घातली आहे व त्या मर्यादेचे आंत आपण राहिले पाहिजे. ब्रह्मचर्याच्या मर्यादेचे अतिक्रमण करणा-यांना अशक्तता, उत्साहहीनता, कडकी, क्षुधामांद्य, (व अतिक्रमण फार झाल्यास प्रमेहादि भयंकर विकार) इत्यादि जे दोष जडतात, त्यांचा विचार केला असतां ब्रह्मचर्याची आवश्यकता गृहस्थाश्रमामध्येही किती आहे, हे सर्वांस दिसून येईल. गृहस्थांची गोष्ट सोडून दिली तरी, ‘ऊनषेडिशवर्षायामप्राप्तः पंचविंशतिम् ।। यः पुमान् गर्भमाधत्ते कुक्षिस्थः स निपद्यते' या वचनांत चरक ऋषींनी, पंचवीस वर्षांपर्यंत पुरुषांना व १६ वषांपर्यंत स्त्रियांना, ब्रह्मचर्याची जी मर्यादा सांगितली आहे, ती पाळण्याचा तरुण जनांनी प्रयत्न केला पाहिजे. आतां अलीकडे आयुर्मर्यादा कमी झाल्याने हल्ली ही मर्यादा कांहीं पुरुषांना राखता येणार नाही हे खरे आहे; तथापि ती २०-२२ वर्षापर्यंत तरी सर्वांनीं राखली पाहिजे. | विद्याथ्र्यांनी ब्रह्मचर्य राखणे म्हणजे लग्न न करणे एवढेच नव्हे,तर स्त्रीपुरुषसंबंधी विषयास मनांत थाराच न देणे हे होय; हे विसरतां कामा नये. कामेच्छेस मनांत संचार करू दिल्याने वीर्यपिंडापासून वीर्यस्खलन होते. म्हणून या विषयासंबंधानें कसलाही विचार मनांत येऊ देऊ नये.