पान:व्यायामशास्त्र.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ९८ ] याम करणे ही गोष्ट अतिशय सुलभ आहे. कांहीं अडचणीमुळे इतर व्यायाम घेता आला नाहीं तरी प्राणायाम करण्यास कोणतीही अडचण पडत नाही. म्हणून त्याची माहिती व त्याचा अभ्यास सर्वांस आवश्यक आहे. | तथापि व्यायाम करण्यास वेळ झाला नाही, तरच प्राणायाम करावा असे नाहीं. नेहमींचा व्यायाम करूनही प्राणायाम केल्याने प्रकृतीस फार फायदा होतो. प्राणायामानें क्षय गेल्याची उदाहरणे युरोपियन वैद्यांनी दिली आहेत. प्राणायामाचे महत्त्व युरोपियन लोकही जाणू लागले आहेत, व डंबेल्सच्या व्यायामाप्रमाणे प्राणायामाचा व्यायामही कांहीं युरोपियन राष्ट्रांनी आपल्या सैन्यांमध्ये सुरू केला आहे. प्राणायाम करण्याचे अनेक प्रकार आहेत. पैकीं अगदी साधा प्रकार पुढील होय. फुफ्फुसे पूर्णपणे हवेने भरेपर्यंत नाकानें सावकाश श्वास घ्यावा. नंतर थोडा वेळ श्वास दाबून धरावा आणि नंतर श्वास सावकाश सोडावा. मधून मधून श्वास जोरानेही सोडावा. याप्रमाणे ५।६ वेळां करावे. पुढे हीच क्रिया वाढवीत वाढवीत १०।२० वेळां श्वासोच्छ्वास करावा. हा प्राणायाम अगदी स्वच्छ व मोकळ्या हवेत करणे जरूर आहे, हे ध्यानात ठेवावे. | प्राणायामाचे अन्य प्रकारांपैकी पुढील प्रकार महत्त्वाचे आहेत. ( १ ) पोटावर दोन्ही हात ठेवावे वे श्वास घेण्यास आरंभ करावा. पोट पूर्णपणे फुगेपर्यंत श्वास आंत घ्यावा. श्वासाने फुफ्फुसे पूर्णपणे फुगलीं म्हणजे थोडा वेळ श्वास दाबून धरावा व नंतर ने सोडावा.