पान:व्यायामशास्त्र.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९७]: खांद्यास बळकटी आणण्याकरिता व्यायाम.–हाताने दोरीस धरून लोंबकळणे, झाडावर चढणे, सिंगल बार व मलखांब करणे इ०.. - मनगट बळकट करण्याकरितां व्यायाम.-जोडी घंटेप्रमाणे हातांत धरून ती घटेप्रमाणे हालविणे. ( मूळच्या स्थितीशीं काटकोन होईपर्यंत जोडी दोन्ही अंगांस वळवावी. ) - नेहमीप्रमाणे जोडी धरून ती समोर आडवी ( हाताच्या सरलरेषेत ) येईल अशी वांकवावी. बोटांकरितां.–बोटांची शेवटें पेटीच्या झाकणाखाली किंवा मोठ्या पुस्तकाखाली घालून ते उचलावे. फुफ्फुसांचा विकास करण्यास प्राणायाम हा सर्वोत्कृष्ट व्यायाम होय. मोठ्या स्नायूंना श्रम झाले म्हणजे फुफ्फुसांचा संकोच-विकास जोराने होतो; म्हणून मोठ्या स्नायूंचा व्यायाम फुफ्फुसांच्या विकासाचे एक साधन आहे. पण हे साधन अप्रत्यक्ष होय. याहीपेक्षां एक नजीकचे व प्रत्यक्ष साधन आहे. ते साधन प्राणायाम हे होय. फुफ्फुसांचा संकोच-विकास जोराने झाल्याने जर त्यांचा विकास होतो, तर तो ( संकोच-विकास ) इतर स्नायूंना श्रम देऊन करविण्यापेक्षा, प्रत्यक्ष फुफ्फुसांकडून करविला तर ते कार्य अधिक सोपे होईल हे उघड आहे. म्हणून फुफ्फुसांचे विकासासाठी प्राणायामाचा उपयोग करावा. जोराने श्वासोच्छ्रास केल्याने फुफ्फुसांचा संकोच-विकास जोराने होतो; व संकोच-विकास जोराने झाल्याने स्नायु मोठे होऊन बंळः । कट होतात म्हणून प्राणायामाने–जोराच्याः श्वासोच्छ्रासानें--फुफ्फुसांचा विकास करणे ही गोष्ट साध्य होण्यासारखा आहेप्राणा