पान:व्यायामशास्त्र.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९६ ] कामे आहेत. म्हणून ही कामें ज्या व्यायामाने होतात ते सर्व व्यायाम पोटाचे स्नायु मजबूत करण्यास उपयोगी आहेत. | खणणे, झाडावर चढणे, दोरीस किंवा दुस-या एकाद्या पदार्थास लोंबकळणे, मलखांब करणे, कमान टाकणे ही कामे करतांना पोटाच्या स्नायूंना काम पडते म्हणून त्यांपासून पोटाचे स्नायूस मजबुती येते. वांकून वाढणे, किंवा केर काढणे, छतास रंग देणे वगैरे कामें पोटाचे स्नायूस बळकटी आणणारी आहेत. टॅपिझ, सिंगलबार यास लोंबकळून जे व्यायाम करावयाचे असतात, त्यांनी पोटाच्या स्नायूंस चांगला व्यायाम होतो, म्हणून ते स्थूल उदर नाहीसे करण्यास उत्तम उपाय होत. क्षुधामांद्य व मलावष्टंभ ह्या विकारांसाठी जे व्यायाम पूर्वीच्या भागांत सांगितले आहेत, तेही पोटांचे स्नायूस बळकटी आणणारे आहेत. रक्ताशय मजबूत करणारे व्यायाम.—ज्या ज्या व्यायामांना विशेष शक्ति खर्च करावी लागते ते सर्व व्यायाम रक्ताशयास बळकट करतात. शक्तीचे काम करतांना जोराच्या रक्तप्रवाहाची जरूरी असते, म्हणून अशी कामे करतांना रक्ताशयाची क्रिया जोराने चालू असते. धावणे, पोहणे, मोठी वजने उचलणे वगैरे व्यायामांनी रक्ताशयाची शक्ति वाढते.