पान:व्यायामशास्त्र.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ९५] नेववेल तितका न्यावा.नंतर थोडे थांबून डावा हात पुढे आणून उजव्या बाजूकडे न्यावा व उजवा हात पुढून मागे ओढून मागल्या बाजूने डाव्या हाताकडे न्यावा. याप्रमाणे आळीपाळीने करावे. हा व्यायाम करित असतां हाताचे स्नायु ताणून धरावे, खांदे हालू देऊ नयेत, दंड छातीस दाबून धरावे व हात कोपराजवळ किंचित् वांकवावे. पूर्व तयारी–हात बाजूस सोडून ताठ उभे राहावें. डावा पाय ताठ ठेवून उजवा पाय उचलावा व गुडघ्यांत थोडा वाकवून दोन हात पुढे तिरक्या बाजूने टाकावा. असे करीत असतां हात बाजूने वर उचलून थोडेसे मागल्या बाजूस न्यावे व पाठीस मागील बाजूने बांक देऊन छाती पुढे आणावी, आणि हात ताठ करावे. नंतर पहिल्या स्थितीप्रत येऊन डावा पाय पुढे टाकावा व इतर सर्व कृति बर सांगितल्याप्रमाणे करावी. | छाती मोठी करण्या करितां अवघड व्यायाम.-(१) पॅरललबारवर हात टेकून उभे राहावे. नंतर कोपरे वाकवीत वाकवीत छाती शक्य तितकी खाली न्यावी व फिरून वर आणावी. | (२) दोन खुच्र्या पाठीकडे पाठ करून ठेवाव्या. पाठीवर हात टेकून व सर्व भार हातावर टाकून पाय उचलावे. नंतर हनुवटी तळहाताचे पातळींत येईपर्यंत आंग खाली न्यावे व फिरून वर न्यावे. पोटाचे स्नायु मजबूत करणारे व्यायाम —छाती कमरेकडे ओढणे व पोट आत ओढणे हीं पोटाच्या स्नायूंचीं मुख्य