पान:व्यायामशास्त्र.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| . . भाग, १०, विशिष्ट अवयव बळकट करण्याकरितां व्यायाम शरिराच्या विशिष्ट अवयवांचा विकास करण्यास कोणत्या व्यायामाचा उपयोग करावा हे समजावे म्हणून पुढे अशा प्रकारचे क्लंहीं व्यायाम दिले आहेत. | छाती ( फुफ्फुसे ) मोठी करणारे व्यायाम. फुफ्फुसे ज्या उरः पंजरांत आहेत, त्याचे बाह्य भाग पुढील बाजूस उरोज स्नायु व मागील बाजूस वज्री स्नायु आहेत. हे स्नायु जर लहान असतील तर फुफ्फुसांचा विकास होण्यास फारशी सवड राहणार नाहीं; म्हणून हे स्नायु मोठे असणे अवश्य आहे. | दंड मागे व पुढे नेणें हें छातीच्या स्नायूंचे मुख्य काम आहे. म्हणून ज्या व्यायामांमध्ये दंड छातीचे पुढे व पाठीमागे ओढले जातात ते सर्व व्यायाम छातीचा विकास करणारे आहेत.* अशा व्यायामांपैकीं कांहीं व्यायाम पुढे दिले आहेत. पूर्व तयारी-हात अंगापासून थोडेसे अंतरावर राहतील अशा रीतीनें खाली पसरावे. • उजवा हात शरिराच्या पुढील बाजूने नेववेल तितका डाव्या बाजूकडे न्यावा वडावा हात पाठीमागच्या बाजूने उजव्या हाताकडे 1 पळण्यापासूनही छाती मोठी होते. म्हणून पळण्याचा व्यायाम छाती मोठी करण्यास उपयोगी आहेत.