पान:व्यायामशास्त्र.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ९३ ] खालीं वळून बेंबीच्या अंगानें खालपर्यंत गेले आहे. बेंबीच्या दोन्ही आंगांस या आंतड्याचे जे भाग आहेत त्यासच सामान्य लोक नळ असे म्हणतात. या नळांमध्ये मळ सांचून किंवा वायु सांचून त्यास फुगवटी आली म्हणजे नळ फुगले आहेत असे म्हणतात. हे नळ चोळल्याने त्यांत हालचाल सुरू होऊन त्यांत आडून राहिलेला मळ पुढे ढकलला जातो. म्हणून नळ फुगले म्हणजे ते चोळून घेण्याची वहिवाट आहे. ही वहिवाट तत्त्वास धरूनच आहे; पण या चोळण्याची योग्य पद्धति पुष्कळ लोकांस माहीत नसते म्हणून ती पुढे दिली आहे. | भुईवर साफ निजावें व उजवा नळ खालून वरच्या बाजूस, आडवा नळ उजवीकडून डावीकडे व डावा नळ वरून खालीं चोळीत जावे. याप्रमाणे कांहीं वेळां केलें म्हणजे शौचास होईल. | चोळण्याची ही पद्धति मलाचे स्वाभाविक गतीस धरून आहे, असे दिसून येईल. याचे उलट चोळल्याने मल मागे ढकलिला जाईल हे लक्षात ठेवावे. अजीर्ण व अपचन याकारितां उपाय. सकाळीं अंथरुणांत जागे झाल्यावर शेजारच्या आकृतींत / बेंबी\ / बंबी दाखविलेल्या दिशांनी बेबीभोंवता लच्या प्रदेशांत चोळावे व बेंबीभेव तालचा पोटाचा भाग दाबावा.चोळ7 बेबी ) ण्याकरितां बोटांचा अथवा तळहाताचा उपयोग करावा. 1

=-=} - 0 । 1 - =- =