पान:व्यायामशास्त्र.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जी एवढी चळवळ उडवून दिली, ती त्यांच्यांतील प्रबल मनेावृत्तींमुळेच. कृतीस प्रोत्साहन मनेावृत्तीकडूच मिळते असा मानसशास्त्राचाही अबाधित सिद्धान्त आहे. 'The emotions are the master & the intellect is the servent. असे प्रख्यात तत्ववेत्ते हर्बर्ट स्पेन्सर यांचे मत आहे. असो; पराक्रमाचे मूळकारण ह्या ज्या मनोवृत्ति, त्यांचे प्राबल्य शारीरिक संपत्तीवरच अवलंबून असते. ही गोष्ट अनुभवावरूनही दिसून येणारी आहे. मनोवृत्ति ( वाईट अथवा चांगल्या ) केव्हां प्रबल असतात व केव्हा दुर्बल असतात, याचे अवलोकन केले, तर असे दिसून यते की, जेव्हां शरीर जोमांत असते, तेव्हांच ( अर्थात् तारुण्यांत ) मनोवृत्ति प्रबल असतात, व जसजसे शरीर बलहीन होत जाते तसतशा मनोवृत्तिही दुर्बल होत जातात. शिवाय असेही म्हणतां येते की, जेव्हां शरीर जोमांत असते तेव्हां मनोवृत्ति प्रबल असतात; एवढेच नव्हे, तर तेव्हां त्या बहुधा उच्च प्रतीच्याही असतात. विद्यकरितां, व्यापाराकरितां, किंवा एकादा नवीन उद्योगधंदा करण्याकरितां, दुस-याच्या मदतीची फारशी अपेक्षा न धरतां, स्वतःच्या हिंमतीवर परमुलखीं जाणे, कोणतीही नवीन गोष्ट करण्याचे धाडस करणे, अपमान सहन न करणे, स्नेह्यांकरितां जिवावर उदार होणे, वगैरे श्रेष्ठ प्रतीच्या कृति तारुण्यांत जशा घडतात, तशा उतारवयांत घडत नाहीत. त्याचप्रमाणे आनंदीपणा, मनमिळाऊपणा, उदारपणा, साशंकवृत्तीचा अभाव, इत्यादि चांगल्या मनोवृत्तिही तारुण्यांतच विशेष दृष्टीस पडतात. The history of heroes is the history of youth, HR डिझाएलीनेही म्हटले आहे व सर्व वीरांची चरित्रे, या गोष्टीची साक्ष देत आहेत. उलटपक्षी असेही आढळून येते की, धाडस करण्यास