पान:व्यायामशास्त्र.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ९२ ] | उजवा पाय पुढे आणावा व डावा पायं मागें न्यावा. नंतर उजवा हात जमिनीस लागे तोपर्यंत शरीर पुढील बाजूस वांकवावे. असे करीत असतां उजवा गुडघा वांकवावा व डावा पाय ताठ करावा. असेच वा पाय पुढे ठेऊन करावे. | ४६ पानांतील ५ ब व्यायाम. | कणा व पाठींतील मज्जामंडले यांचे बल वाढविणारा व्यायाम–पूर्व तयारी–पावलांमध्ये सुमारे दीड हात अंतर ठेवून उभे रहावे. हात ताठ पसरावे व हाताच्या मुठी मिठाव्या. धड पुढील बाजूस थोडे वाकवावे. धड हळूच डावीकडे फिरवीत फिरवीत पूर्वी जिकडे तोंड होते तिकडे पाठ होईपर्यंत धड वाटोळे फिरवावे. उजव्या बाजूकडे पाठ होतांना पाठीस आणवेल तितका बांक आणवावा. अशा स्थितीत क्षणभर राहिल्यावर धड पुढील बाजूस वांकवावे व फिरून ते उजवीकडे फिरवून पाठीला मागील बाजूने बांक आणावा; फिरून पुढील बाजूस ओणवे होऊन डावीकडे वळावे. | याप्रमाणे प्रत्येक बाजूकडे पांच पांच वेळां वळावे. । मलावष्टंभ मोडण्याविषयी अन्य उपाय.-आंतड्याचा शेवटचा भाग,म्हणजे ज्यास मोठे आंतडे म्हणतात, ते पोटाचे पुढील भागीं उजव्या बाजूने खालून वर जाऊन बेंबीच्या वरच्या अंगास डावीकडे वळलें आहे व तेथे डावीकडे वळून सुमारे ८।१० बोटे गेल्यावर