पान:व्यायामशास्त्र.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९१ ] - दोन्ही पाय उचलावे व त्याच वेळीं गुडघे वांकवावे व मांड्या जेवढ्या वर वांकवतील (उचलवतील) तितक्या वाकवाव्या नंतर मांड्या मागे नेऊन दोन्ही पाय पूर्वीप्रमाणे ताठ करावे. याप्रमाणे करीत असतां टांचा जमिनीस टेकू देऊ नयेत. उभे राहून वरील प्रमाणेच परंतु एकेक पाय आळीपाळीनें वर उचलून गुडघ्याजवळ वांकवावा व गुडघ्याचे खालीं पायास हातांनी मिठी मारून पाय वर ओढवेल तितका ओढावा. असे अनेक वेळां करावें. पूर्व तयारी-पायांमध्ये फूटभर अंतर ठेवून हात. दोन्ही बाजूंस ताठ पसरावे. छाती बाजूस फिरवून एकदा डावा हात पुढील बाजूस व एकदा उजवा हात पुढील बाजूस येईल अशा रीतीने धड घुसळावे, असे करतांना तोंड व पाय फिरवू नये. पूर्व तयारी-हात खाली करून ताठ उभे रहावे. कमरेजवळ शरीर उजव्या बाजूस वाकवेल तितकें वांकवावे. नंतर ताठ करून डाव्या बाजूस वाकवेल तितके वांकवावे. असे आळीपाळीने करावें. । पूर्व तयारी-दोन्ही पायांमधे एक हात अंतर ठेऊन उभे रहावे. हात दोन्ही बाजूंस ताठ पसरावे.