पान:व्यायामशास्त्र.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कांसारख्या दुष्टांपासून लोकांचे संरक्षण होणार नाही. आतां, विशिष्ट परिमाणाचा पुण्यसंचय झाल्यावाचून मोक्षप्राप्ति होत नाही, अशी जर स्थिति आहे, तर शारीरिक संपत्तीच्या अभावामुळे ज्यांची आयुर्मर्यादा कमी झाली आहे, त्यांचेकडून प्रत्येक जन्मांत पुण्यसंचय थोडा झाल्याकारणाने, त्यांना पुष्कळ जन्म घ्यावे लागतील, हे उघड होत नाही काय ? सत्कर्माना प्रतिबंध करणाच्या दुष्टांपासून आपले रक्षण करण्याबहल प्राचीन ऋषींना आपल्या तपश्चर्येचा सहावा भाग राजास द्यावा लागत असे. यावरूनही पुण्यसंचयाचे रक्षण होण्यास शारीरिक संपसाची आवश्यकता आहे असे दिसून येत नाही काय? तेव्हां एकंदरीत परमार्थ–साधनास शारीरिक संपत्ति आवश्यक आहे असे ठरते. अर्थात् परमार्थसाधन व शारीरिक संपत्ति यांत विरोध आहे, ही कल्पना अज्ञानमूलक आहे असे म्हणण्यास कांहींहीं हरकत नाहीं. ह्या कारणास्तव, परमार्थसाधनासंबंधाच्या भ्रांतिमूलक कल्पनेने शारीरिक संपत्तीची जी उपेक्षा हिंदूंनी केली आहे, ती खरोखरी अक्षम्य आहे असे म्हणावे लागते. आतां ऐहिकसुखप्राप्तीच्या दृष्टीने पाहिले तरीही ही गोष्ट शारीरिक संपत्तीवांचून केवळ दुर्लभ आहे; म्हणून शारीरिक संपत्तीची उपेक्षा करणे अगदी चुकीचे आहे. ऐहिक सुखप्राप्तीस अत्यंत आवश्यक अशा गोष्टी, पराक्रमशीलता, ज्ञान, उल्लसित मनोवृत्ति, शांतपणा, व रोगमुक्तता ह्या आहेत; व ह्या सर्व गोष्टींस प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने शारीरिक संपत्ति कारण आहे. पराक्रमाचे एक साधन शारीरिक संपात्त आहे ही गोष्ट तर स्पष्टच आहे. पराक्रमास दुसरी अवश्य गोष्ट प्रबल मनोवृत्ति ही आहे. महत्त्वाकांक्षा, साहसप्रियता इत्यादि प्रबल मनोवृत्तीवांचून हातून पराक्रम होणे शक्य नाहीं. अलेक्झंडर, सीझर, चेगिजखान, नेपोलियन, इत्यादि पुरुषांनी जगांत